केसांना रंग लावण्याआधी आणि नंतर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबाबत जाणून घ्या..


व्यक्तिमत्त्व आकर्षक करण्यासाठी इतर सौंदर्य प्रसाधने जितकी गरजेची आहेत, तितकेच केसांना रंग लावणेही आवश्यक आहे. तथापि, केसांवर अनेक दिवस रंग टिकून राहावा यासाठी रंग लावण्याआधी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे, असे केशतज्ज्ञ म्हणतात. केसांना रंग लावण्याआधी आणि नंतर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबाबत जाणून घेऊया. 

काळजीपूर्वक करा निवड - केसांना रंग लावण्याआधी प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीचा विचार करायला हवा. जर तुमच्याकडे वेळेचा अभाव असेल तर नेहमी तुमच्या केसांच्या नैसर्गिक रंगापेक्षा एक ते तीन शेड फिका रंगच निवडायला हवा. 

कंडिशनिंग करणे नका विसरू - केसांना रंग लावण्याच्या काही आठवडे आधी डीप कंडिशनिंग ट्रीटमेंट जरूर घ्या. त्यामुळे केसांवर रंग दीर्घकाळ टिकून राहील. तसेच रंगातील रसायनांमुळे केसांचे नुकसानही होणार नाही.
रंग लावण्याआधी - रंग लावण्याच्या एक दिवस आधी केस शँपूने धुवा. तसेच केसांच्या कलपासाठी फेड रेसिस्टंट (सहजगत्या न उडणारे रंग) रंगच निवडा. उदा. बरंगडी किंवा ब्राउन इ. 

रंग लावल्यानंतर - केसांना रंग लावल्यानंतर ते शँपूने धुण्याची घाई करू नका, कारण डाय मॉलेक्युअस केसांमध्ये सेट होण्यास वेळ लागतो. कमीत कमी 48 तासांनंतरच केस शँपूने धुवा. तसेच केस धुण्यासाठी अधिक गरम पाणी घेऊ नका, कारण त्यामुळे क्युटिकल्सची (केसांचा बाह्य थर) क्सिकरणामुळे हानी व्हायला लागते. त्यामुळे रंग फिका पडू लागतो. 

नियमित काळजी - रंग लावल्यानंतर आठवड्यातून एकदा केसांची कंडिशनिंग करा. केसांना हायड्रेशन स्ट्रेंथसाठी ते आवश्यक आहे. केसांच्या रंगात असलेली रसायने केस निर्जीव करतात. अशा वेळी वातावरणातील बदलांमुळे होणारी केसांची हानी कंडिशनिंगमुळे टाळता येते.
थोडे नवीन जरा जुने