आपले कुटुंब हसत- खेळत ठेवायचं असेल तर प्रत्येक स्त्रीने 'हे' वाचायाला हवं...


कधी कधी कामाच्या गडबडीत स्त्रीचं कुटुंबाकडे, नातेवाइकांकडे दुर्लक्ष होतं. हे दुर्लक्ष ती जाणूनबुजून करत नाही, तर अनवधानाने होतं. याच्यासाठी तिने आधी स्वत:कडे लक्ष दिलं पाहिजे. कारण तिच्यातच कुटुंब समावलेलं आहे.


प्रत्येक क्षेत्रात स्त्रीने प्रवेश केला आहे. ती जशी सफाईकामगार आहे, तशी वैमानिकही आहे. कोणी कारकून आहे, तर कोणी कलेक्टर. अब्जावधी रुपयांची उलाढाल करणा-या बँकांची कर्तीधर्तीही स्त्रीच आहे. स्त्रिया आता सर्वत्र आगेकूच करत आहे. असं असूनही तिचं चूल आणि मूल सुटलेलं नाही. संसाराचे पाश ती कसोशीने सांभाळतच आहे. अशा धावपळीच्या जीवनात तिला स्वत:बद्दल विचार करायला वेळ कधी असतो, तर कधी नसतो. मात्र तिने स्वत:बद्दल विचार करायला पाहिजे. तरच तिचं कुटुंब हसत खेळत राहील.


आजकाल स्त्रिया स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करताना दिसतात. हे योग्य नाही. स्त्रीवरच कुटुंबाची जबाबदारी असते. त्यामुळे तिने स्वत:च्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. ती आजारी पडल्यावर संपूर्ण कुटुंबाचं स्वास्थ्य बिघडतं. तिच्या तंदुरुस्तीवर कुटुंबाचं काम चालतं.

कामाच्या वाढत्या व्यापामुळे स्त्रियांचं स्वत:च्या खाण्याकडे दुर्लक्ष होतं. आग्रहाने एखादा पदार्थ बनवणारी, प्रेमाने खायला घालणारी स्त्री स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष का करते ते कळत नाही. खाण्याकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम तिच्या आरोग्याकडे होतो. शरीरातून लोह आणि कॅल्शियमचं प्रमाण घटतं. याने अशक्तपणा येतो.


ऑफिसच्या कामात कितीही गुंतलेलं असलं तरी, स्त्रियांनी घरच्या स्वच्छतेकडे जातीने लक्ष दिलं पाहिजे. घरची अस्वच्छता विविध रोगांना आयतंच आमंत्रण देते.

कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीमध्ये संवाद असणं गरजेचं आहे. हा संवाद म्हणजे कुटुंब सुखी, शांत असण्याचं लक्षण आहे. कुटुंबात सुसंवाद निर्माण करण्याचं काम स्त्री करू शकते. तिच्यात कोणाचंही मतपरिवर्तन करण्याची शक्ती आहे. कुटुंबातील व्यक्तींचा काही कारणांमुळे एकमेकांशी अबोला निर्माण होतो. अशा वेळी तिने समेट घडवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.

बहुतेक कार्यालयांना रविवारी सुट्टी असते. शाळा-कॉलेजेसही रविवारचे बंद असतात. त्यामुळे रविवार हा प्रत्येकाच्या सुट्टीचा दिवस. या रविवारी आराम करावाच. शिवाय एक छोटेखानी गेटटुगेदर ठेवावं. सर्वानी मिळून बाहेर फिरायला जावं.

कितीही त्रास पडला तरी बाहेर जाऊन खाणं टाळावं. जास्तीत जास्त पदार्थ घरी बनवावेत. शेवटी घरचं अन्न सकस आणि पौष्टिक असतं.

महिन्यातून एकदा सुटी काढावी. या सुटीचा उपयोग कुटुंबासाठी करावा.

जीवनात नातेसंबंधांना भरपूर महत्त्व आहे. त्यामुळे नाती टिकवून ठेवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले पाहिजेत. 

भांडणं, हेवेदावे बाजूला ठेवून संवाद साधला पाहिजे. नातेसंबंधातल्या प्रत्येकाशी, मित्रमैत्रिणींशी पत्र, इमेल, एसएमएस नाहीतर मोबाइल या संवाद माध्यमातून संपर्कात राहिलं पाहिजे.
थोडे नवीन जरा जुने