जाणून घ्या जीलेबिला इंग्रजीत काय म्हणतात...

जिलेबी, केवळ भारत नव्हेतर संपूर्ण भारतीय उपखंडात प्रसिद्ध असणारे पक्वांन्न! मुळात जिलेबी ही भारतीय नसून ती मुघल सम्राटाच्या कालखंडात मुघलांच्या तुर्की आणि पर्शियन कडून भारतात लोकप्रिय झाली!

तीच्या उगमस्थानामुळं जिलेबी ही मुस्लीम समाजात लोकप्रिय असलेले पक्वांन्न ,पण ब्राह्मणाच्याही सोवळ्याच्या स्वयंपाका घरात ती अशी कांही घट्ट बसली आहे, की कोणाला जिलेबी मुस्लिमांनी भारतात आणली म्हटले तर विश्वास देखील बसणार नाही!

महाराष्ट्रीय समाज जीवनात जिलेबी लग्नासारख्या समारंभात एक प्रतिष्ठीत पाक्वांन्न म्हणून ओळखली जाते. साधारणपणे १९७० पूर्वीच्या लग्नात 'लापसी' किंवा शिरा ,रव्याचे लाडू हेच मोठे पक्वांन्न समजले जात असे. त्यानंतर ती जागा बुंदीच्या लाडूने घेतली. 

लग्न ,मुंजी, साखरपुडा , बारसे ,वास्तुशांती अशा कार्यक्रमात प्रतिष्ठीत देखील बनली. कारण एकेकाळी आणि आजही एखाद्या व्यक्तीने लग्नात कोणते पक्वांन्न केले यावरून त्याची प्रतिष्ठा ठरत असे.
आता तुम्हाला एक मजेदार गोष्ट माहित आहे ? जीलेबीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात?? तर या प्रश्नाचे उत्तर आहे जिलेबीला इंग्रजी मध्ये “स्वीट क्वायल'' म्हंटले जाते.

जिलेबी ही आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते. जिलेबी तयार करण्यासाठी खुप मेहनत करावी लागते. नॉर्थ इंडियामध्ये लोक नाष्ट्यामध्ये जिलेबी खातात. दही किंवा दूध आणि जलेबी असा त्यांचा आहार असतो.

ज्या लोकांचे वजन खूप कमी आहे अशा लोकांसाठी जिलेबी खाण्याने वजन वाढवण्यात फायदा होऊ शकतो.गरम दुधात जिलेबी खाण्याने शरीराचा चांगला विकास होतो.
थोडे नवीन जरा जुने