गायीच्या पाठीवरुन हात फिरवल्यास नकारात्मक विचार नाहीसे होतातअमरावती : “आपल्यातील नकारात्मक विचार गायीवर हात फिरवल्याने आपण हे सगळं विसरुन जातो. हा चमत्कार आहे. हे सर्व आपल्या संस्कृतीमध्ये सांगितले आहे,” असे वक्तव्य महिला व बालकल्याण मंत्री आणि अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं.
तिवसा तालुक्यातील सार्शी येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या समारोपीय भाषणात यशोमती ठाकूर यांनी गाईवरुन अजब विधान केलं आहे.

तिवसा तालुक्यातील सार्शी येथे गावाचे दैवतं समजल्या जाणाऱ्या एका मृत गाईच्या पुण्यतिथी निमित्ताने गावात सात दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावेळी जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी समारोपीय कार्यक्रमाला मार्गदर्शन केले.

“पर्सनॅलिटी डेवलपमेंटची खूप सारे कोर्स येतात. अनेक मोठे मोठे लोक प्रशिक्षण घेतात यासाठी मोठ्या प्रमाणात पैसाही घेतला जातो. मात्र यामुळे आपण आपली संस्कृती विसरतो.  असेही यशोमती ठाकूर  म्हणाल्या
थोडे नवीन जरा जुने