तरुण असताना ह्या सहा गोष्टी नेहमी लक्षात ठेवाच !


पैशाची बचत कशी करावी आणि ते दीर्घकाळासाठी चांगल्या कंपन्यांच्या शेअरमध्ये आणि म्युच्युअल फंडात गुंतवण्याची कला,

काहीही झाले तरी तुमचे आईवडील तुमच्या पाठीशी उभे राहतात. तुमच्या बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडबाबत हे लागू पडत नाही.

कुणीही तुमचा बेस्ट फ्रेंड नसतो. जोपर्यंत त्यांना किंवा त्यांच्या करिअरला तुम्हीं संभाव्य धोका ठरत नसता तोपर्यंत तुम्ही त्याचे बेस्ट फ्रेंड असता एकदा का तुम्ही प्रगती केली की कुणीही तुमचा बेस्ट फ्रेंड नसतो. तुम्ही कुणालाही त्याचा खरा पगार विचारू नका. तो कधीच खरा आकडा सांगणार नसतो,

स्वतः स्वतःचे स्टार्ट अप सुरू करणे श्रेयस्कर असते. पण ते करण्यापूर्वी तुम्हांला कराव्या लागणा-या धडपडीसाठी, संघर्षासाठी हाती पैसा जमवून ठेवा.

स्वतःचे न्यूड फोटो कधीही शेअर करू नका. तुम्ही स्वतःचे न्यूड फोटो काढले तरी ते कुणालाही पाठवू नका. अगदी जवळच्या विश्वासू व्यक्तीलाही पाठवू नका.

कधीतरी मद्यपान चालू शकते पण आयुष्यत कधीही धूम्रपान करू नका. तुम्हाला त्यातील ऐट, मर्दानगी आकर्षित करेल पण या सगळ्या चुकीच्या कल्पना आहेत. धूम्रपानामुळे तुम्ही कुठल्यातरी रुग्णालयात मृत्युशय्येवर पडला असाल तेव्हा हे तुम्हाला कळेल.
थोडे नवीन जरा जुने