पोटात जंत असल्यास "हे" घरगुती उपाय नक्कीच ठरतील फायदेशीर !


सगळ्यात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे दोन - तीन मोठे टोमॅटो चिरून त्यावर सैंधव मीठ आणि काळे मिरे पूड घालून रिकाम्या पोटी काही दिवस खाण्याने जंत नाहीसे होतात. 

सकाळी उठताच मुलांना थोडासा मध द्या. त्यानंतर अर्ध्या तासाने गरम पाण्यात थोडासा ओवा, सैंधव मीठ मिसळून द्या. यामुळे जुलाब होतील आणि जंत बाहेर येतील. हा उपाय दर तीन - चार दिवसांनी करा.

अर्धा ग्रॅम ओव्याच्या चूर्णात चिमूटभर काळे मीठ मिसळून रात्री रोज गरम पाण्याबरोबर पिण्याने जंत नाहीसे होतात. 

नियमितपणे एक आठवडा गाजराचा रस पिण्यानेही जंत बाहेर येतात. कांद्याचा रस २० ग्रॅम घेऊन त्यामध्ये थोडासा मध मिसळून सकाळ - संध्याकाळ पिण्यानेही फायदा होतो.
थोडे नवीन जरा जुने