थंडीत पेरू खाताय, मग हे नक्कीच वाचापेरू हे खूप सहजासहजी मिळणारे फळ आहे. त्यामुळे बर्‍याच जणांना हे खाल्याने होणार्‍या फायद्याविषयी माहिती नसते. खूप कमी लोकं असतील ज्यांना पेरूंपासून आरोग्यासाठी होणार्‍या फायद्याची कल्पना असेल. 

पेरूमध्ये असणारे व्हिटॅमिन आणि खनिज शरीराला अनेक प्रकारच्या आजारांपासूम वाचवण्यास मदत मिळते. सोबतच पेरू आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता अधिक मजबूत करतात. डॉक्टर सुद्धा नेहमी पेरू खाण्याचा सल्ला देतात. 

मात्र थंडीच्या दिवसांत पेरु खाण्याचे असंख्य फायदे आहेत. साधरण ठंडीच्या मौसमात पेरू भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. पेरूमध्ये कॅल्शिअम, ‘क’ जीवनसत्त्व, फॉस्फरस, लोह भरपूर प्रमाणात असते. तसेच तंतूमय पदार्थ, खनिजे, प्रथिने, पिष्टमय पदार्थदेखील पेरूत आहेत. त्यामुळे या मोसमात उपलब्ध होणारे पेरु भरपूर प्रमाणात खावे.

 - ‘क’ जीवनसत्त्वामुळे पेरू खाल्ल्याने विविध आजाराविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यामुळे पेरू आवर्जून खावा. 
- मात्र पेरू खाताना मध्यम पिकलेल्या पेरुची निवड करावी.
 - पेरु हा उत्सावर्धक देखील आहे. पेरुत मोठ्या प्रमाणात खनिजे आणि जीवनसत्त्व आहेत ज्याची आपल्या शरीरास आवश्यकता असते.
 - अरुची, भूक मंदावणे, आम्लपित्त या विकारांवर पेरू फायदेशीर आहेत.
 - मलावरोधाचा त्रास कमी करण्यासही पेरु फायदेशीर आहे.
थोडे नवीन जरा जुने