बीट खाण्याचे "हे" आरोग्यदायी फायदे वाचून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित !बीटचे ज्युस प्यायल्याने शरीरातील न केवळ हिमोग्लोबिनची मात्र वाढते तर इतरही लाभ होतात. जगभरात बीट फक्त सलाड स्वरूपातच खाल्ले जाते. विशेषतः लाल रंगाच्या बीटची शेती विविध राज्यांमध्ये केली जाते. 


बीटमध्ये आढळणारा अ‍ँटीऑक्सिडेंट हा पदार्थ शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. हा एक नैसर्गिक शर्करा मिळण्याचा स्रोत आहे. यात सोडियम, पोटॅशियम, फॉस्फोरस, क्लोरिन, आयोडीन आणि अन्य महत्त्वाची जीवनसत्वे असतात.

1. बिटमध्ये नायट्रेट नावाचे रसायन असते. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो. बिट एनीमिया या आजारावर खूपच फायदेशीर आहे. शरीरात रक्त तयार करण्याच्या प्रक्रियेत बिट मदत करतो. बिटच्या सेवनामुळे शरीराची रोग प्रतिकारक शक्ति वाढते.

2. वजन कमी करण्याचा बीट उत्तम उपाय आहे, कच्चे बीट किंवा कमीतकमी २ बीटचे ज्यूस दररोज उपाशी पोटी प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

3. डॉंग गुजरात येथील हर्बल जाणकार कॅन्सरसारख्या भयावह आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना बीट खाण्याचा सल्ला देतात. यांच्यानुसार कॅन्सर नियंत्रणात ठेवण्यात बीट फायदेशीर ठरते. आधुनिक संशोधनामध्येही कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी बीट महत्वपूर्ण असल्याचे सांगण्यात आले आहे. बीटमध्ये आढळणारे लाल रंगाचे बेटाईन नावाचे रसायन कॅन्सरग्रस्त कोशिकांची वृद्धी रोखण्यात यशस्वी ठरले आहे.


4. दररोज बिटचे सेवन करणा-या व्यक्तींना अपचन होणार नाही. रात्री झोपण्यापूर्वी एक किंवा अर्धा ग्लास बिटचे ज्यूस औषधाचे काम करतो. जिममध्ये वर्कआऊट करणा-या व्यक्तींनी बिट खायला हवे. त्यामुळे शरीरात एनर्जी राहते आणि थकवा दूर होतो. शिवाय जर हाय बीपी असेल तर बिटचा ज्यूस प्यायल्याने एक तासात शरीर नॉर्मल होतं. कच्चे बीट खाल्ल्याने शरीराला पर्याप्त मात्रामध्ये फायबर मिळते जे पाचन क्रिया संतुलित करून अपचनाची समस्या दूर करण्यात उपयुक्त आहे.


5. बीटमध्ये उच्च प्रमाणात फॉलिक अॅसिड असते. हे गर्भवती महीला आणि त्याच्या होणा-या बाळासाठी महत्त्वाचे आहे. गर्भवती महीलांना यामुळे अतिरिक्त उर्जा मिळते.

6. बीट ज्युसमध्ये आढळणारा नाईट्रेट ब्लड प्रेशर कमी करतो. हाय ब्लड प्रेशर असणा-यांसाठी बीट ज्युस वरदान आहे.7. लंडन विद्यापिठातील संशोधकांनी रोज बिटचा ज्यूस पिणा-या व्यक्तींचा समावेश आपल्या अभ्यासात केला. त्यांना रोज गाजर किंवा सफरचंदाबरोबर बिटचा ज्यूस घेणा-या लोकांचे उच्च रक्तदाब नियंत्रणात असल्याचे आढळून आले. संशोधनानुसार, रोज दोन कप बिटचा ज्यूस पिणा-या व्यक्तींचा उच्च रक्तदाब नियंत्रणात असल्याचे आढळून आले. मात्र याचे प्रमाणाबाहेर सेवन घातकही सिद्ध होतं.


8. आळस, थकवा जाणवत असेल तर बिटचे सेवन करा. बिटमध्ये कार्बोहायट्रेड असते, त्यामुळे शरीरातील एनर्जी वाढते. पांढ-या बिटला पाण्यात उकळून घ्या. हे पाणी जखमेवर, मुरुमांवर फायदेशीर असते.


9. किडनी आणि पित्ताशय विकारांमध्ये बीट ज्युस आणि गाजर ज्युस एकत्रित करून पिणे आरोग्यदायी असते. बीट ज्युस रक्तवाहिन्यांना सक्रीय करतो. वय वाढण्याबरोबर तुमची कार्यशीलता, चपळता कमी होऊ लागली असेल तर रोज एक ग्लास बीट ज्युस घ्या.
थोडे नवीन जरा जुने