'हे' आहेत दही खाण्याचे आरोग्यदायी फायदे,जाणून घ्या!आपल्या आहारात निश्चितपणे सामील करावे असे काही दुग्धजन्य पदार्थ आहेत. दही हा त्यापैकी एक पदार्थ असून त्यात अनेक महत्त्वाचे गुण आहेत. दही आपल्या आहाराचा महत्त्वपूर्ण भाग आहे. यात भरपूर आरोग्यदायी गुण आहेत, पण त्याचसोबत सौंदर्य वाढवण्यात देखील हा महत्त्वाची भूमिका निभावतो.

विविध गुणांचे भांडारदह्यात कॅल्शियम, प्रोटीन आणि व्हिटॅमिन्स मुबलक प्रमाणात आढळतात. दुधाच्या तुलनेत दही आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे. यात दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असते. त्याचप्रमाणे दह्यात लॅक्टोज, लोह आणि फॉस्फरस सुद्धा चांगल्या संख्येत असते.

दह्याचे फायदे

पचन प्रणाली सक्षम बनवतो
रोग प्रतिकार क्षमता वाढवण्यास मदत करतो
पोटासंबंधित आजारात उपयोगी
दह्यात ओवा टाकून पिल्यास अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी होतो.


आजारपणात उपयोगी

उन्हाचा त्रास झाल्यावर दही पिले पाहिजे.
दररोज आहारात वापर केल्यास दात आणि हाडे मजबूत होतात.


सर्दीमुळे श्वसननलिकेत संसर्ग होतो. यापासून वाचण्यासाठी दही खाल्ले पाहिजे.


हाडे ठिसूळसारख्या आजारात लढण्यासाठी मदत करतो.
वजाइनल इंफेक्शनमध्ये दही खाणे लाभदायी ठरते.
दररोज दही खाल्ल्यास उच्च् रक्तदाब होण्याचा धोका कमी होतो.


दही फक्त आरोग्यासाठी चांगले आहे असे नाही, तर सौंदर्य वाढवण्यात देखील मदत करतो.
चेहर्‍यावर दही लावण्यास त्वचा मुलायम होते आणि त्वचा उजळते.
दह्याने चेहर्‍याचा मसाज केल्यास हे ब्लीचप्रमाणे काम करते.
त्वचेचा शुष्कपणा कमी होतो


सनबर्न आणि टॅनिंग सारख्या समस्येवेळी दही लावले पाहिजे. असे केल्याने त्वचा सतेज होते. 

दही एक चांगला कंडिशनर असून यामुळे केस मृदू होतात.
थोडे नवीन जरा जुने