आयुष्यात ह्या ३ गोष्टी जर तुमच्याकडे असतील, तरच तुम्ही भाग्यशाली व्यक्ती म्हणून ओळखाल !


1. धन.

सुखी जीवनासाठी पैसा असणे खूप आवश्यक आहे. पैसा नसेल तर मान मिळत नाही आणि यशही. कुटुंबाचे पालन-पोषण करण्यासाठी धन आवश्यक आहे. सध्याच्या काळात शिक्षण घेण्यासाठीसुद्धा भरपूर पैसा लागतो. पैसे नसेल तर एखाद्या आजारी व्यक्तीवर उपचार करणेसुद्धा शक्य नाही. वृद्धावस्थेमध्ये पैसाच सर्वात मोठा आधार असतो. जीवनात धनाची आवश्यकता सर्वात जास्त म्हातारपणातच असते.

2. निरोगी (स्वस्थ) शरीर.
जीवनात सदैव सुखी राहण्यासाठी शरीर तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. शरीराला एखादी व्याधी असेल तर तुम्ही व्यवस्थित काही खाऊ-पिऊ शकत नाहीत. अशा अवस्थेमध्ये तुम्ही जीवनातील अनेक सुखांपासून वंचित राहू शकता. जर तुम्हाला सामान्य आजार असेल तर त्याचेही त्रास सहन करावा लागतो. आजार मोठा असेल तर दवाखाना, औषधी इ. गोष्टींमध्ये पैसा आणि वेळ खर्च होतो. निरोगी शरीर असणारा व्यक्ती कोणतेही काम करण्यास सक्षम असतो. गरज पडल्यास तो शारीरिक श्रम करू शकतो, याउलट रोगी व्यक्ती हे करू शकत नाही. यामुळे शरीर निरोगी असणे आवश्यक आहे.

3. पत्नी जी प्रिय बोलणारी असेल.
महाभारतामध्ये महात्मा विदुर यांनी पत्नीला तिसरे आणि जर ती गोड बोलणारी असेल तर चौथे सुख सांगितले आहे. पत्नी सुंदर असेल तर तुमचे मन बाहेर भटकणार नाही आणि या स्थितीमध्ये करण्यात आलेल्या पापांपासून तुम्ही दूर राहू शकतो. सुंदर पत्नी जर गोड बोलणारी असेल तर दुग्धशर्करा योग समजावा.

गोड म्हणजे सर्वांशी नम्रतापूर्वक संवाद साधून ती कुटुंबातील सर्व सदस्यांना प्रभावित करू शकते. कुटुंब आनंदी असेल तर तुम्ही स्वतः प्रसन्न राहू शकता. पत्नी कटू बोलणारी असेल तर पती-पत्नीमध्ये दररोज कोणत्या न कोणत्या कारणावरून वाद होऊ शकतात. यामुळे पत्नी सुंदर आणि गोड बोलणारी असेल तर व्यक्तीला दुःखी राहवे लागत नाही.
थोडे नवीन जरा जुने