तंदूरुस्त राहण्यासाठी मीठपाणी घेऊन पहा, झालेले बदल पाहून तुम्हालाही धक्का बसेल


आत्ताच्या जमान्यात तंदूरुस्त राहण्यासाठी प्रत्येकजन धडपडत असतो. सध्या अनेक आजारांचे साम्राज्य सर्वत्र पसरले आहे. त्यामुळे अनेक रोग आपल्या शरीरात प्रवेश करत असतात. यासाठी धावपळीच्या युगात अगदी सोपा आणि स्वस्त परवडेल असा उपाय जो आपल्याला रोगापासून दूर ठेवत असेल तर किती चांगली गोष्ट आहे ना? तर त्यासाठी आपल्याला दररोज सकाळी पाण्यातून मीठ घालून पिण्याचे आहे. 

यामुळे बर्याच हानिकारक समस्या जसे कि स्थूलपणा व मधुमेह यापासून बचाव होण्यास मदत होते. फक्त मधुमेहच नाही तर अनेक जीवघेण्या आजरापासून आपला बचाव होतो. काळ्या मिठाचे (सैंधव मिठाचे) पाणी प्यावे यामध्ये ८० पेक्षा जास्त खनिजे असतात जी आरोग्यासाठी खूपच उपयोगी असतात. तर हे पाणी कसे तयार करायचे ते आपण पाहूयात.

एका ग्लास मध्ये कोमट पाणी व एक चमचा काळे मीठ घालून ते चांगले विरघळावे इतकेच करायचे आहे. हे पाणी अत्यंत गुणकारी असते. हे पाणी पिल्याने काय फायदे होतात हे आपण पाहूयात.

पचन संस्था: या मीठ पाण्याने तोंडातील लाळ निर्माण करणाऱ्या ग्रंथी अधिक कार्यरत होतात. यामुळे पोटातील पाचक इन्जाइम्स जे हायड्रोलिक असिड, नैसर्गिक मीठ व प्रथिने पचवण्यास मदत करते. याशिवाय यकृत, आतडे यांच्यात अन्न पचनास आवश्यक इन्जाइम्स तयार होतात.

नैसर्गिक जीवाणू: या मीठ पाण्यात अनेक खनिजे असल्याने हे मीठ पाणी आपल्या शरीरास हानिकारक असणारया जीवाणूविरोधात काम करते. यामुळे आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

त्वचा विकार: या पाण्याने त्वचेच्या समस्या दूर होतात. त्वचेवरील पुटकुळ्या, मुरूम, काळे डाग अशा समस्या दूर होतात. शरीर शुद्धीमुले त्वचा उजळू लागते.

वजन कमी करणे : कोमट पाण्यातून काळे मीठ प्याल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. यामुळे स्थूलपणा कमी होतो. कोलेस्ट्रोल देखील कमी करण्यास मदत करते. मधुमेह होण्याची शक्यता कमी होते.

झोपेसाठी उपयुक्त : शरीरातील हार्मोन्स निर्यंत्रित राखते जे हार्मोन्स तणावाशी निगडीत आहेत ते हार्मोन्स बँलंस करते. यामुळे झोपेच्या समस्या कमी होतात. अनिद्रेचा त्रास पूर्णपणे बरा होतो.
थोडे नवीन जरा जुने