'ह्या' नैसर्गिक पद्धती हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी आहेत फायदेशीर...


हार्मोन्सशी संबंधित अनियमितता झाल्यावर महिलांना अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो. हार्मोनल बदल नियंत्रित करण्यासाठी साधारणत: करण्यात येणार्‍या हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीपेक्षा नैसर्गिक उपायांनाच प्राधान्य द्यावे. कोणते नैसर्गिक उपाय करावेत, ते जाणून घेऊया.

हार्मोन्सची पातळी बिघडण्याची अनेक लक्षणे आहेत आणि ती ओळखणे खूप आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, उपचार करण्यास खूप उशीर झाला असल्याचे अनेक महिलांना माहीतच नसते. अनियमित मासिक पाळी, मूड खराब होणे, थकवा येणे आणि वारंवार पोट खराब होणे यासारखी लक्षणे हार्मोन्सशी निगडित समस्यांकडे इशारा करतात.

उपरोक्त इशारा मिळाल्यावर तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा. वास्तविक असे होत आहे किंवा नाही, याची तपासणी डॉक्टर अनेक चाचण्या केल्यानंतरच करतात.

ही समस्या उद्भवण्यामागे तणावसुद्धा कारणीभूत आहे. महिलांच्या शरीरातील हार्मोन्सच्या नैसर्गिक सायकलला तणाव प्रभावित करतो. तज्ज्ञांच्या मते, ज्या गोष्टींमुळे तणाव निर्माण होतो, त्यापासून दूरच राहावे. तसेच रात्री पुरेशी झोप घ्यावी आणि रिलॅक्स होण्यासाठी ध्यानसाधना करावी. महिन्यातून एक किंवा दोनवेळा बाहेर फिरायला जावे.

नियमित व्यायाम करा. आठवड्यातून एकदा मैलभर चालावे.

हिरव्या पालेभाज्या आणि सर्व प्रकारच्या आंबट फळांचे नियमित सेवन करावे. सुका मेवा, सर्व प्रकारच्या धान्यांपासून तयार करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांचा जेवणात समावेश करावा.
थोडे नवीन जरा जुने