दारूची नशा झटपट उतरावयची असेल'हे' साधे-सोपे उपाय लक्षात ठेवा


दारू घेतल्यानंतर अनेकदा लोकांना सुरवातीलाच नाश चढण्याची तक्रार असते, अशा परिस्थितीत लोकांना मळमळणे, भूक न लागणे अश्या समस्या उद्भवतात. तसेच अधिक मात्रामध्ये दारू पिण्याने काही तासानंतर नशा चढते. काहीना नशेमध्ये राहणे आवडते त्र काहीना त्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे नशा उतरविण्यासाठी काही सोपे उपाय खास वाचकांसाठी चेकमेट टाईम्सच्या माध्यमातून.

ब्रेकफास्ट

हँगओव्हर झाले असेल तरी ब्रेकफास्ट मिस करणे योग्य नाही. वेळेवर नाश्ता करा. याने ब्लड शुगर लेवल वाढते आणि हँगओव्हरपासून राहत मिळते. ब्रेकफास्टमध्ये ब्रेड किंवा ऑम्लेट खाऊ शकता. ऍपल ज्यूस पिणे योग्य ठरेल.

भरपूर पाणी ‍प्या

पर्याप्त मात्रेत पाणी प्या. याने डिहाइड्रेशनची तक्रार दूर होईल आणि ब्रेन सुरळीत काम करेल. हँगओव्हर झाल्यावर पाण्याच्या कमीमुळे मेंदूचे टिशू आक्रसून जातात ज्यामुळे डोकेदुखीला सामोरा जावे लागते.

चहा

आल्याचा चहा यासाठी सर्वोत्तम आहे. याने पोट स्वच्छ होऊन जाते. तसेच कोरा चहा असेल तर त्याहूनही चांगले.

अंडी

दारू पिण्याने लिव्हरला नुकसान होते. अशात अंडी खा. अंडीमध्ये आढळणारे तत्त्व दुष्परिणाम कमी करण्यात मदत करते.

मल्टीव्हिटॅमिन

जर आपण रेग्युलर ड्रिंक करत असाल तर आपल्याला दररोज मल्टीव्हिटॅमिन औषधाचे सेवन करायला हवे. हे शरीरातील पोषक तत्त्वांची कमी दूर करते.

योग

श्वसनासंबंधी व्यायाम किंवा योग करा. मेडिटेशन करणे योग्य राहील. याने ऑक्सिजनचा संचार सुरळीत राहील. व्यायाम जमत नसल्यास वॉक तरी करायला हवा.

वरील उपायांचा वापर केला तर तुमची नशा उतरण्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल. तसेच दारू पिऊन सुद्धा तुमचे आरोग्य काही प्रमाणात अबाधित राखले जाईल. त्यामुळे या उपायांचा वापर नशा करणाऱ्यांसाठी उपयोगाचे आहे. तसेच बहुतेक लग्न झालेल्या युवकांसाठी या उपायांद्वारे तुम्ही तुमच्या बायकोच्या बोलण्यावर नियंत्रण आणु शकता.
थोडे नवीन जरा जुने