फक्त हे उपाय करा पोट कधीच वाढणार नाही
सकाळी मॉर्निंग वॉक कमीत कमी ४० मिनिटे करावी... सोबत कोणीही न घेता वॉक करावी.. एकटे जावे... अजिबात बोलायचे नसते... मध्ये थांबायचे देखील नाही... कोणाला हवा असेल तर कानाला हेडसेट लावून गाणी ऐकत वॉक केला तरी चालेल... बर्याचदा महिला वॉक ला जातात आणि गप्पा बडबड करत येतात... असे केल्याने फायदा होत नाही. नुसतीच सुरवात करणार्यांनी हळू हळू १५ मिनिटापासून वेळ वाढवावा.


 वॉक हून आल्यावर किमान अर्धातास तरी काहीही खाऊ किंवा पिऊ नये.

गोड पदार्थ, दुधाचे गोड पदार्थ, चीज, जंक फुड्स, बेकारी फूड्स पूर्णता बंद करावेत.

चहा घेणे हळू हळू करत बंद करावा.... आणि जर कोणास शक्य नसेल तर थोडे साखरेचे प्रमाण कमी व चहाचे प्रमाण देखील कमी करून घ्यावा. दिवसातून एकदा घेणे.

शक्य असेल तर नारळाचे पाणी प्यावे तसेच एक काम पाणी गरम करून त्यामध्ये बडीशेप टाकून ते पाणी प्यावे.

रात्रीचे जागरण करणे म्हणजे पोट वाढवणे होय. कारण झोप पूर्ण नाही झाली तर शरीरातील कोलेस्टेरॉलची लेवल वाढते त्यामुळे पोट वाढण्याची शक्यता असते.

कोल्ड्रिंक पिणे हानिकारक आहे कारण त्यामध्ये साखरेचे प्रमाण खूप असते.

रात्रीच्या जेवणानंतर किमान अडीच तास तरी झोपू नये..

या सर्व गोष्टी दररोज कराव्यात... एखाद्या दिवसी काहीतर चविष्ट खाऊ वाटले तर.... महिन्यातून दोनदा खाण्यास चालेल, जसे कि काही कार्यक्रम किंवा सन असेल तर खावे पण प्रमाणात उरलेले दिवस कडक पाळावेत.

पुरेशी झोप, योग्य आहार घेणे व नियमित व्यायाम करणे याशिवाय कोणतेच पर्यत पोट कमी करण्यासाठी असू शकत नाही. आणि या गोष्टी आपण स्वतासाठी करू शकतो नाही का?
थोडे नवीन जरा जुने