वेगात चालणारे लोक असतात दीर्घायुषी !

एका ताज्या अभ्यासातून दावा करण्यात आला आहे कि जे लोक वेगात चालतात ते जास्त दिवस जगतात शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, ब्रिस्क वॉकर्स म्हणजे वेगाने चालणारे लोक तीन मैल प्रति तासाच्या गतीने एका मिनिटात शंभर पावलापर्यंत चालतात व हळू चालणाऱ्या लोकांच्या पुढे निघून जातात. दुसरीकडे हळू चालणारे लोक एक वा दोन मैल प्रति तासाच्या वेगाने चालतात व एका मिनिटात जेमतेम ५० पावलेच चालू शकतात.


या अध्ययनासाठी शास्त्रज्ञांनी ४ लाख हून अधिक लोकांच्या चालण्याच्या पद्धतीचा अभ्यास केला. त्यात असे दिसून आले की, चालण्याची गती कोणत्याही व्यक्तीच्या दीर्घ आयुष्याशी संबंधित आहे व त्यात कमी वजन, सामान्य व जास्त वजनाचे सगळे लोक समाविष्ट आहेत. 

हळू चालणाऱ्या कमी वजनाच्या लोकांची दीर्घ काळ जगण्याची शक्यता सर्वात कमी असते. पुरुषांमध्ये सरासरी ६४ वर्षे तर महिलांमध्ये ७१ वर्षे. वेगाने चालण्याच्या जीवनकालासोबतच्या संबंधाबाबत झालेले हे पहिलेच अध्ययन आहे. 

याआधीच्या अध्ययनांमध्ये वयाचा संबंध बॉडी मास इंडेक्स व शारीरिक तंदुरुस्तीसोबतच असल्याचे सांगण्यात आले होते. हे संशोधन लोकांच्या आयुष्यात वजनापेक्षा शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व असल्याचे अधोरेखित करते. थोडक्यात शारीरिक तंदुरुस्ती बॉडी मास इंडेक्सच्या तुलनेत वय सांगण्याचा चांगला सूचक होऊ शकतो.
थोडे नवीन जरा जुने