मनाची प्रसन्नता, जिद्द,व एकाग्रतेने परीक्षेत यश मिळते...


अभ्यासाशी गोडी निर्माण करा, तुमची इच्छाशक्ती महत्त्वाची आहे,इच्छाशक्ती जिद्द अथक प्रयत्न अवधान किंवा मन एकाग्र करण्याची क्षमता व मनाची प्रसन्नता हे सर्व गुण एकत्र केल्यास परीक्षेमध्ये यश मिळवणे कठीण नाही.

मन लावून अभ्यास करणे महत्त्वाचे :

अभ्यासाचे वजन वाटता कामा नये,तो रडत रखडत केला जाऊ नये, तो मन लावून करावा, मनाची एकाग्रता मन एकवटणे महत्त्वाचे असते,अभ्यास विषयावर लक्ष केंद्रित झाले पाहिजे,नको नको ते विचार यांची हकालपट्टी करा. असा एकही विचार येऊन देऊ नका. निर्धारपूर्वक मन स्वच्छ मोकळ व प्रसन्न ठेवा. नकारात्मक विचारांना अजिबात थारा देऊ नका.अशा वातावरणात केलेला अभ्यास केलेले वाचन हे अधिक चांगल्या प्रकारे मेंदूकडे ग्रहण केले जाते.

वाचा आणि लिहा :

वाचणारी व्यक्ती समृद्ध बनते. लिहिण्याचा तसेच बोलण्याचा वेग वाढतो. स्मरण प्रक्रियेत प्रवाहीपणा येतो.आठवण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाही. वारंवारच्या उधळणीमुळे त्यात एक ताजेपणा येतो. अर्थात हे सर्व घडून येण्यासाठी अभ्यास विषयांमध्ये रस असला पाहिजे. गोडी असली पाहिजे.मन एकाग्र चित्त करून अभ्यास विषयांमध्ये रुची दाखवली तर स्मरण वाटते.

स्मरणशक्ती वाढवा :

प्रत्यक्ष पेपर सोडवणे सुरू असताना काही गाळलेले शब्द आठवत नाहीत. परीक्षेच्या आधल्या रात्री सकाळचे जे आठवत होते ते ऐन परीक्षेत आठवत नाही.असा अनुभव अनेकदा येतो.परीक्षेची वेळ संपल्यानंतर पेपर देऊन वर्गातून बाहेर पडताच ते गाळलेले शब्द आठवतात.आता आठवून हे काहीही उपयोगाचे नसते.दगा देणारी घातक समृद्धी नको,असे का होते, याचा विचार करा. आत्मपरीक्षण करा.वरवर मन न लावता केलेले उथळ वाचन,आवडीचा अभाव आणि परीक्षेच्या वेळी निर्माण झालेले ताणतणाव यामुळे आपले स्मरण आपल्याला दगा देते.
थोडे नवीन जरा जुने