मुलांना आजारांपासून कायमचे दूर ठेवण्यासाठी काय उपाय कराल ?


धकाधकीच्या आयुष्यात मुलांना कमी वयातच आरोग्यदायी सवयींबद्दल सांगणे गरजेचे असते. सकाळपासून रात्रीपर्यंत जर मूल हे सगळ शिकले तर संसर्गासोबतच बऱ्याच जीवघेण्या आजारांपासून वाचू शकते.

व्यायाम करणे फक्त मोठ्यांसाठीच नाही, तर मुलांसाठीसुद्धा सकाळी लवकर उठून व्यायाम करणे फायदेशीर आहे. सकाळी लवकर उठल्याने तणाव दूर होतो आणि मुले दिवसभर ताजीतवाने आणि आनंदी राहतात. आजकाल मुले अभ्यासाच्या जास्त दबावामुळे तणावाचे शिकार होतात, परंतु सकाळी लवकर उठल्याने तणावाचा धोका कमी होतो.

जमिनीवर बसून जेवणे आधुनिक जीवनपद्धतीमुळे आजकाल जास्त लोक डायनिंग टेबलवर बसून खाणे पसंत करतात. परंतु हे आरोग्यासाठी तितके फायदेशीर नसते, जितके जमिनीवर बसून खाणे असते. त्यामुळे आपल्या मुलांना जमिनीवर बसून जेवण करणे ‌शिकवावे. याने पचनसंस्था चांगली राहते आणि रक्तप्रवाह व्यवस्थित होतो.

जेवणाच्या मध्ये पाणी पिणे सामान्यत: मुले जेवणादरम्यान पाणी पितात, परंतु यामुळे आरोग्यास नुकसान पोहोचते. जेवण करताना पाणी प्यायल्यामुळे मुलांच्या पोटात जठरामध्ये निर्माण होणारा पाचकरस बनण्यास सुरुवात होते. यामुळे खाणे पचत नाही आणि त्यांना बद्धकोष्ठता होऊ शकते. त्यामुळे मुलांना जेवणानंतरच पाणी पिण्यास सांगावे. तसेच खाल्ल्यानंतर काही वेळ थांबूनच पाणी प्यावे. यामुळे पोटासंबंधी आजारांपासून बचाव होतो.

संगणक, मोबाईलचा वापर कमी आजकाल मुले शाळेतून आल्यानंतर जास्त वेळ मोबाइल आणि संगणकावर घालवतात. अशात बरीच प्रकरणे बघायला मिळतात, ज्यात मोबाइल आिण संगणकामुळे मुलांचे होणारेे नुकसान पाहायला मिळते. मोबाइलवर संगणकावर दिवसभर गेम खेळणे, इंटरनेट चालवणे यामुळे मुलांना कानासंबंधी तसेच डोळयांसंबधी समस्या उद्भवतात. ब्रेन ट्यूमर होण्याचादेखील धोका वाढतो. बॅटरी कानाजवळ फुटू शकते आणि यामुळे ऐकण्याची क्षमता नष्ट होते.

ब्रश करून झोपणे सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्याआधी मुलांना ब्रश करून झोपण्यास सांगावे. बऱ्याच मुलांना तोंडाच्या ज्या समस्या असतात त्या ब्रश न करण्याच्या सवयीमुळे होतात. रात्री ब्रश न केल्यामुले जेवण दातांमध्ये अडकून राहते व यामुळे बॅक्टेरियाची निर्मिती होते. 

ज्यामुळे कॅव्हिटीज, तोंडाचा वास आणि हिरड्या दुखणे यांसारख्या समस्या होतात. ब्रश करण्याबरोबरच जेवणानंतर गुळण्या करण्यास सांगावे. यामुळे तोंडात संसर्ग निर्माण होणार नाही.
थोडे नवीन जरा जुने