सर्व प्रकारची कमजोरी दूर करण्यासाठी करा "अशा" प्रकारच्या सॅलडचे सेवन.


जेवण लवकर संपवायचे असेल तर सॅलड हा सर्वात योग्य पर्याय आहे. लवकर पोट भरण्याच्या इतर पद्धती म्हणजेच सँडविच, चिप्स यामध्ये मेद (फॅट्स) असतात. तसेच मोठ्या प्रमाणात कॅलरी असतात. त्यानुसार आहारतज्ज्ञ अँजेला डोडेन यांनी जगभरातील सलाडांच्या प्रकारांविषयी दिलेली माहिती...

वॉलफोर्ड सॅलड 

 
250 ग्रॅममध्ये : 490 कॅलरी आणि 40 ग्रॅम फॅट
अंड्याचा 250 ग्रॅम बलक घेतल्यास महिलांचे दिवसभराचे जेवण होते. त्यात अक्रोड वापरल्यास कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करता येते. सफरचंद आणि ओव्याचा वापरही करता येतो.


बटाट्याचा सॅलड
 
250 ग्रॅममध्ये : 550 कॅलरी आणि 45 ग्रॅम फॅट
बटाट्यामुळे कार्बोहायड्रेटच्या स्वरूपात ऊर्जा मिळते. त्यापैकी बहुतांश ऊर्जा फॅट्समधून मिळते. कमी कॅलरी असणारे पदार्थ अधिक आरोग्यदायी असतात. यात कांद्याची पात आणि चवीनुसार लिंबू वापरू शकता.


सीझर सॅलड 
 
250 ग्रॅममध्ये : 550 कॅलरी आणि 45 ग्रॅम फॅट
यापासून कॅल्शियम आणि प्रोटीन मिळते हे याचे वैशिष्ट्य आहे. उकडलेल्या अंड्यांपासून तयार केले जाते. यात लोणीही वापरता येते. हे पारंपरिक सॅलड आहे. त्याशिवाय पत्ता कोबीचा वापरही करता येतो.


ग्रीक सॅलड 
 
250 ग्रॅममध्ये : 232 कॅलरी आणि 19 ग्रॅम फॅट
बकरीच्या दुधापासून तयार केलेल्या पनीरमध्ये कॅल्शियम आणि प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते, तरीही इतर अनेक पदार्थांच्या तुलनेत यात फॅटचे प्रमाण कमी असते. पण तेलकट पदार्थामुळे या सॅलडच्या फॅटमध्ये वाढ होते. भरपूर ऑक्सिडेंट असणार्‍या कांद्याचा यात वापर केला जातो. ऑलिव्हमुळे मोनोसॅच्युरेटेड फॅट मिळतात. सुमारे 10 कॅलरी. यात मिठाचे प्रमाण योग्य असते.


निकॉइस सॅलड 
  
250 ग्रॅममध्ये : 413 कॅलरी, 21 ग्रॅम फॅट
यात काळे मिरे, टोमॅटे, ओवा आणि भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. ट्युना ताजी असेल तर त्यात ओमेगा-3 चे प्रमाणही भरपूर असते. यात ज्वालारोधक तत्त्वे असतात. त्यामुळे रक्ताच्या गाठी बनत नाहीत. हिरव्या फळभाज्या खाल्ल्यानेही हृदयरोगापासून दूर राहता येते.


टोमॅटो, कैरी, मोजेरेला (इटालियन चीज) सॅलड 
 
250 ग्रॅममध्ये : 425 कॅलरी, 37 ग्रॅम फॅट
या सॅलडमध्ये ऑलिव्हचे तेल वापरले जाते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य अत्यंत चांगले राहते. दिवसभरासाठी गरजेचे व्हिटॅमिन ईचे प्रमाणही यात भरपूर असते. टोमॅटोमुळे यातून अतिरिक्त अँटिआॅक्सिडंट्स मिळतात. हे ब्रेडबरोबर सर्व्ह करता येते. तो संतुलित आहार ठरू शकतो.


कोलेसलॉ सॅलड (एक प्रकारची भाजी) 
 
250 ग्रॅममध्ये : 362 कॅलरी आणि 31 ग्रॅम फॅट
कॅन्सरपासून बचाव करणारी अशी ओळख असलेली पत्ताकोबी यात आहे. नियमित खाल्ल्याने कॅन्सरची शक्यता राहत नाही. यात अंड्याचा पिवळा बलक वापरू शकता. त्यामुळे फॅटचे प्रमाण वाढते.


इटालियन सॅलड 
 
40 ग्रॅममध्ये : 10 कॅलरी आणि फॅट अगदी नावापुरते
यात केवळ पानांचा वापर केला जातो. यात इटालियन भाज्यांच्या लाल पानांचा वापर केला जातो. यात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट असतात, हे प्रयोगांवरून सिद्ध झाले आहे.


इंग्लिश सॅलड 
 
60 ग्रॅममध्ये : 10 कॅलरी फॅट केवळ नावापुरते
यात अर्धी वाटी काकडी, टोमॅटो, पत्ताकोबी याचा वापर केला जातो. त्यामुळे पोषणही मिळते. सजावटीच्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट सॅलड आहे.
थोडे नवीन जरा जुने