केस कुरळे आहेत का? 'ह्या' घरगुती उपायांनी बनवा केस सिल्की आणि शायीनी !


स्ट्रेटनरच्या अधिक वापरामुळे केस ड्राय आणि कमकुवत होऊ लागतात. यामुळे मुली पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये फक्त केस स्ट्रेट करण्यासाठी खर्च करतात. 

परंतु या उपायामुळेही केस खराब होण्याची शक्यता राहते. अशा समस्यांपासून दूर राहण्यासाठी येथे सांगण्यात आलेले काही साधे-सोपे घरगुती उपाय करून तुम्ही तुमचे केस स्ट्रेट करू शकता.

1. दूध आणि मध समान प्रमाणात एकत्र घेऊन, हे मिश्रण केस धुण्यापूर्वी एक तास अगोदर केसांना लावा. या उपायाने रुक्ष आणि कर्ली केस सरळ होतील.

2. नारळाचे तेल थोडेसे गरम करून केसांना लावून हलक्या हाताने मालिश करा. त्यानंतर गरम टॉवेलने डोके झाकून घ्या. या उपायाने केस चमकदार आणि सरळ होतील.

3. दोन अंड्यामधील बलक (पिवळा भाग) चांगल्याप्रकारे फेटून घ्या. त्यानंतर या मिश्रणामध्ये दोन चमचे ओलिव्ह ऑइल टाका. ब्रशच्या सहायाने हे मिश्रण केसांवर दोन तास लावून ठेवा. त्यानंतर शाम्पू लावून केस स्वच्छ धुवून घ्या. या उपायाने केस स्ट्रेट होतील.

4. एक स्प्रे बाटलीमध्ये पाणी आणि दुध समान प्रमाणत भरून घ्या. हे मिश्रण संपूर्ण केसांवर समप्रमाणात स्प्रे कारून घ्या. त्याननंतर मोठे दात असलेल्या कंगव्याने केस विंचरून घ्या. हे मिश्रण एक तास केसांना लावून ठेवल्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कंडीशनरचाही उपयोग करा. या उपायाने केस स्ट्रेट होतील.


5. नारळ पाण्यामध्ये थोडासा लिंबू रस मिसळून घ्या. हे मिश्रण एक दिवसभर फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर एक क्रिमी पेस्ट तयार होईल. ही पेस्ट चांगल्याप्रकारे केसांना लावून मालिश करा. त्यानंतर गरम टॉवलचा उपयोग करा. एक तासानंतर केस धुवून घ्या. आठवड्यातून तीन वेळेस हा उपाय करा. या उपायाने केस स्ट्रेट होतील.
थोडे नवीन जरा जुने