'ह्या' ट्रिक्स ऑफिसमधील काम सोपे करण्यास मदत करतील !


जर तुम्हाला कामाच्या ओझ्याखाली दबून जायचे नसेल, तर आधी तुम्ही तुमच्या कामाची जबाबदारी समजून घेतली पाहिजे. काम करत असताना आपल्या कामाविषयी आवड निर्माण करणे, तसेच इतर स्टाफशी सुसंवाद असणे. महात्वाचे आहे.  

ज्या क्षणी तुम्ही तुमच्या कामाची पूर्ण माहिती घ्याल तेव्हाच तुम्हाला तुमच्या कामाविषयी प्रेम वाटू लागेल.तुमचे काम तुम्हाला आवडू लागेल आणि तुम्ही त्यात स्वतःचे १०० % देण्याचा प्रयत्न कराल. 


जर तुम्हाला कोणतेही काम दिले, तर ते काम वेळेच्या आत पूर्ण करा. असे केल्यामुळे तुम्ही तुमच्या वरिष्ठांचा विश्वास जिंकू शकता.

जर तुम्ही विश्वासू नसाल, तर कोणतेच आव्हानात्मक काम तुम्हाला मिळणार नाही आणि असे झाले, तर तेच तेच काम करून तुम्ही कंटाळाल आणि मग तुम्हाला कामाचे ओझे वाटू लागेल. तुम्हाला कोणतेही नवीन काम मिळाले, तर तुम्ही तुमच्या सहका-यांसोबत चर्चा करून त्या कामाला सुरुवात करा . यामुळे तुम्हाला नवीन कल्पना सुचतील. दुस-याला मदत केली, तर तुम्हाला ही मदत मिळेल, हे कायम ध्यानात घेणे गरजेचे आहे.
थोडे नवीन जरा जुने