अ‍ॅलिव्ह ऑईलचे असेही काही भन्नाट फायदे


केस गळतीचा त्रास नसणार स्त्री असो की पुरुष आजच्या जमान्यात विरळच म्हणावा लागेल. हिवाळ्यामध्ये केस गळतीचा त्रास बर्‍याच लोकांना होतो.

 कारण, हिवाळ्यामध्ये वातावरण थंड राहत असल्यामुळे फारसं पाणी पिल्या जात नाही. त्यामुळे डोक्यात कोंडा होऊन केस गळतीचे प्रमाण वाढते. 

अनेक उपाय करूनही केस गळती थांबत नसेल, तर एकवेळा ऑलिव्ह ऑईलचा वापर करून बघा. ऑलिव्ह ऑईलचे खाण्यामधील फायदे जवळपास आपल्या सर्वांनाच माहिती असतात. परंतु, फक्त खाण्यामध्ये नाही तर केसांसाठी, त्वचेसाठीदेखील ऑलिव्ह ऑईल लाभदायी आहे. केसांच्या समस्येवर ऑलिव्ह ऑईल रामबाण उपाय आहे. चला तर मग जाणून घेऊया ऑलिव्ह ऑईलचे फायदे 

1. स्काल्प हेल्दी ठेवण्यासाठी: तुमचे केस वारंवार गळत असतील, तर तुमच्या स्काल्पमध्ये पोषकतत्त्वांची कमतरता झाली असावी, असे म्हणता येईल. पोषकतत्त्वांच्या कमतरतेमुळे केसांची मजबूतीदेखील कमी होते. ऑलिव्ह ऑईलमध्ये अँटिऑक्सिडंन्टस भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे स्काल्प हेल्दी ठेवण्यासाठी ऑलिव्ह ऑईलचा वापर अवश्य करा. 

2. कोंड्याची समस्या दूर होते: ऑलिव्ह ऑईलने मसाज केल्यास स्काल्प चांगल्या प्रकारे मॉईश्‍चराइज राहते. त्यामुळे हिवाळ्यात कोंड्याची समस्या दूर होऊन केस गळती थांबण्यास मदत होते. 

3. केसांची वाढ होण्यास मदत होते: केसांना ऑलिव्ह ऑईलने मसाज केल्याने केसांची वाढ चांगली होण्यास मदत होत असून ऑलिव्ह ऑईलने केसांना मजबूती देखील मिळते.
थोडे नवीन जरा जुने