"या" गोष्टी केल्यास तुम्ही कॉंप्युटरवर अधिक प्रभावीपणे काम कराल आणि तेही फ्रेश राहून..


आजकाल कॉंप्युटर आपल्या जीवनात अत्यावश्यक बनले आहे. कामाचे ठिकाण असू द्या की घर, कॉंप्युटरशिवाय आपण कामच करू शकत नाही. यामुळेच नकळतपणे आपण थकलेले असूनही कॉंप्युटरपासून दूर राहू शकत नाही.

अशा वेळी एक अडचण असते की, आपण कॉंप्युटरवर काम करताना 100 टक्के चांगले काम कसे करायचे आणि फ्रेश कसे राहायचे ? 

कॉंप्युटरवर खूप अधिक काम केल्यामुळे थकल्यासारखे वाटत असेल आणि काम करण्यावाचून पर्याय नाही अशी स्थिती असेल तर काय करायचे, याच्या काही कानगोष्टी आम्ही येथे सांगत आहोत. या गोष्टी केल्यास तुम्ही कॉंप्युटरवर अधिक प्रभावीपणे काम कराल आणि तेही फ्रेश राहून.

- कारण नसताना कॉंप्युटर वापरू नका.

- कॉंप्युटरवर सलग अधिक वेळ न बसता तासा-दीड तासाने एक दोन मिनिटांसाठी का होईना खूर्चीवरून उठून चार पावलं फिरा आणि पुन्हा बसा.

- खूर्चीवर बसल्यानंतर पाठ मागे टेकू द्या. 

- कीबोर्ड, माऊस 90 अंशात हाताला येतील असे राहू द्या. 

- खाली पायाला आवश्यक तर आधार द्या. 

- कॉंप्युटरवर काम करताना फोनला खांद्याने किंवा मानेने दाबून बोलू नका.

- अधिक काळ फोनवर बोलायचे असेल तर हेडफोनचा वापर करा.

- काम करताना शरीर सैल आणि मन शांत ठेवा. 

- प्रत्येक तीन चार तासातून एकदा डोळ्यांवर थंड पाण्याचे झपके मारा.

- स्क्रीनच्या प्रकाशाचा त्रास होऊ नये यासाठी अ‍ँटीग्लॅमर कोटिंग किंवा ग्लास लावून घ्या.

- नियमितपणे व्यायाम करा. योगासने, प्राणायाम आणि त्राटक केल्यास आणखी चांगले.
थोडे नवीन जरा जुने