महिलांना तणावमुक्त आनंदी जीवन जगायचे असेल तर 'हे' नक्की वाचा !


जीवनात आनंदी, उत्साही राहणे आपल्या मन:स्थितीवर अवलंबून आहे. बहुतांश वेळेस कामाचा व्याप असूनही व्यक्ती आनंदी असते, तर काही वेळेस काम आणि तणावात आनंद मिळविता येत नाही. तणावात येणे ही सर्वसाधारण बाब आहे. अतिरिक्त काम आणि तणावामुळे नकारात्मक भावनेकडे वळले जाते. यापासून मुक्त होण्यासाठी आठ पद्धतींचा अवलंब करण्याची आवश्यकता आहे. 

जॉब बदला
नोकरीच्या ठिकाणी मन लागत नसेल तर ताबडतोब जॉब बदलण्याचा विचार करायला हवा. काही महिला अशाही असू शकतात की, एकाच ठिकाणी काम करणे त्यांना कंटाळवाणे वाटत असते. त्यामुळे तुमच्या कामाप्रती तुम्ही प्रामाणिक राहू शकत नाही. काही वेळेस खोटे बोलावे लागते. कारण काम करण्याच्या ठिकाणी आज जायचे नाही, यासाठी कोणते ना कोणते कारण तुम्ही शोधणार आहात. एखाद्या ओझ्रयासारखे काम तुम्ही करू नका. या पद्धतीची कारणे तुम्ही शोधत असाल तर ताबडतोब जॉब सोडण्याचा आणि नवीन जॉबचा निर्णय घ्यायला हवा. नवीन जागी आपण उत्साह आणि नव्या जोमाने कामाला लागा. 

शॉपिंग करा 
महिलांसाठी शॉपिंग हा विषय अगदी जिव्हाळ्याचा आहे. शॉपिंगची आवड असणा-या महिलांना शॉपिंग करताना कितीही वेळ आणि पैसा खर्च झ्रााला तरी त्यातून त्यांना थकवा जाणवत नाही. याउलट त्या यातूनही आनंद लुटत असतात. मन प्रसन्न ठेवण्यासाठी शॉपिंग हे चांगले, वेळेवर महिलांचे मन प्रसन्न ठेवण्याचे काम करणारा हा एक उपाय आहे. काही महिला आपले घरातील टेन्शन घालविण्यासाठी देखील शॉपिंगचा चांगला वापर करून घेतात. जॉब करणा-या महिलांनी घरी जातांना थोडे मार्केटमध्ये थांबून फळे, भाजी वगैरे घ्यावी. त्यामुळे तुमचे टेन्शन काही प्रमाणात का असेना कमी होईल. कारण भाव करण्याच्या नादात आपण आपल्या टेन्शनच्या विचारांपासून दूर जातो, त्यामुळे मन हलके होते. काही वेळेस शॉपिंगदेखील आपल्याला तणाव मुक्तीस मोठी मदत करते. 

मुलांबरोबर खेळा
तुमच्या घरी मुलं नसतील तर तुम्ही जवळील एखाद्या पार्कमध्ये रोज संध्याकाळचा वेळ घालवावा. कारण उद्यानामध्ये अनेक समाजाचे आणि अनेक स्वभावाची मुले येत असतात. त्यांचे बोलणे, भांडण करणे आणि हसणे हे पाहून देखील काही वेळेस आपल्यामध्ये एक प्रकारचा उत्साह संचारतो. या लहान मुलांसोबत तुम्ही खेळलात तर आनंद द्विगुणित होतो. दिवसभराचा थकवा केव्हा निघून गेला हे कळणार देखील नाही. 

पाळीव प्राणी बाळगा
यूनिवर्सिटी ऑफ मॅसाच्यूसेट्सच्या 2009 मधील संशोधनातून असे सिद्ध झ्रााले आहे की, ज्या घरात एखादा पाळीव प्राणी असेल आणि त्या घरातील व्यक्ती त्या प्राण्यासोबत वेळ घालवत असेल तर ते सर्व तणावमुक्त जीवन जगत असतात. आपण आपल्या घरी एखादा डॉगी किंवा मांजराचे पिल्लूदेखील पाळू शकता. त्यांना पाळणे जरा कठीणच आहे. यापेक्षा रंगीबेरंगी मासे घरात व्यवस्थित ठेवल्यास अधिक उपयुक्त ठरू शकतात. 

दिनचर्येत परिवर्तन करा 
आपली दिनचर्या मुले आणि पतीच्या जेवणापासून सुरू होते आणि रात्री त्यांच्याच जेवणाने संपत असेल तर या रुटीन लाइफमध्ये तुम्हीच परिवर्तन करू शकता. या दिनचर्येनुसार व्यक्तीस तणाव येण्याची शक्यता असते. यासाठी तुम्ही एखादे फिटनेस सेंटर लावू शकता. त्यामुळे देखील मन:स्थितीत परिवर्तन होऊन, व्यक्ती उत्साही व आनंदी राहते. परंतु हे सर्व तुम्ही काही दिवसांसाठी आत्मसात करावयाचे आणि नंतर आपली दिनचर्यापरत सुरू करावयाची. 

ध्यान, योगावर लक्ष केंद्रित करा 
काही महिलांना योग आणि ध्यान हे काय आहे हे समजते. पण काहींना हे माहित नसते की, योग आणि ध्यान हे वेगवेगळे दोन विषय आहेत. आपणास आपल्या जीवनात आनंदाचा अभाव आहे, असे वाटत असेल तर आपण जरूर ध्यानाचा आसरा घेऊ शकता. आपल्या जीवनातील टेन्शन, मनावरील ताण कमी करण्यासाठी ध्यानाचा उपयोग करून घेणे केव्हाही चांगले. ध्यान लावण्याने शरीर हलके झ्राल्यासारखे वाटते. 

कपडे अन् अ‍ॅक्सेसरीजमध्ये बदल 
कपड्यांमुळे आपले व्यक्तित्व तसेच आपल्या मन:स्थितीचे आकलन समोरच्या व्यक्तीला लगेच करता येत असते. आपणास आपल्या मित्र परिवारात किंवा जवळच्या लोकांचे आवडते बनायचे असेल तर आपण रोजच्यापेक्षा कपड्यांमध्ये तसेच त्या जोडीला वापरत असणारे एक्सेसरीजमध्ये बदल करा. या एक्सेसरीज आपल्या खिशाला परवडतीलच अशा पद्धतीने खरेदी करा. 

अंतरंगातील कलागुणांना द्या वाव 
प्रत्येक व्यक्तीच्या सुप्त इच्छा पूर्ण होतातच असे नाही. पेंटर, डांन्सर, सिंगर, गार्डनिंग असो की स्वयंपाक किंवा आणखी काहीतरी आवडत्या गुणाला आपल्या व्यस्त प्रोफेशनमुळे वेळ देता येत नाही. परंतु काही कारणास्तव हे सर्व शौक बाजूला ठेवणे गरजेचे असते. मात्र, हे शौक आपल्या जीवनातील असीम आनंद देखील आणू शकतात.
थोडे नवीन जरा जुने