चिकू खाल्ल्याने शरीरात होतील 'हे' आरोग्यदायी बदल, घ्या जाणून...


चिकू आपल्या विशेष चवीमुळे सर्वांच्या आवडीचे फळ आहे. चिकू खाल्ल्याने शरीरात विशेष प्रकराचा उत्साह, चैतन्य निर्माण होते. यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. चिकूचा रस रक्तात मिसळून उर्जा निर्माण करतो. 

चिकूची साल ताप नाशक आहे. चिकूच्या सालीमध्ये टॅनिन असते. आतड्यांसाठी चिकूचे सेवन अत्यंत फायदेशीर ठरते. चिकूच्या बियांमध्ये सापोनीन आणि संपोटिनीन नावाचा कडवट घटक असतो.

चिकूचे फायदे -

चिकुमध्ये ७१ टक्के पाणी. १.५ टक्के प्रोटीन आणि २५.५ टक्के कार्बोहायड्रेट असते. यामध्ये व्हिटॅमिन ए चांगल्या प्रमाणात तर व्हिटॅमिन सी कमी प्रमाणात असते. या फळामध्ये १४ टक्के शर्करा असते तसेच यामध्ये फॉस्फरस आणि लोह जास्त प्रमाणात असते.

हाडांसाठी चिकू खूप फायदेशीर आहे. चिकुमध्ये फॉस्फरस आणि आयर्नचे अतिरिक्त प्रमाण असते, जे हाडांसाठी खूप आवश्यक आहे. कॅल्शिअम, आयर्न आणि फॉस्फरसची चांगली मात्र असल्यामुळे हाडांच्या मजबुतीसाठी चिकू लाभदायक आहे.


चीकुमुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते. यामध्ये अँटी व्हायरल आणि अँटी बॅक्टीरियल गुण पॉलिफेनॉलिक अँटीऑक्सीडेन्ट घटक आहे. यामधील अँटीऑक्सीडेन्ट घटक शरीरातील विषाणूंना नष्ट करतात. पोटॅशियम, आयर्न, फॉलेट, आणि नियासिन हे घटक पचनक्रियेला स्वस्थ ठेवतात.


चिकुमध्ये व्हिटॅमिन ई आढळते जे तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. यामुळे तुमची त्वचा स्वस्थ आणि सुंदर होईल. चिकूच्या बियांचे तेल केस वाढीसाठी फायदेशीर ठरते.



चिकू थंड, पित्तनाशक, पौष्टिक, गोड फळ आहे. जेवणानंतर चिकूचे सेवन केल्यास निश्चितच लाभ होईल. चिकूच्या सेवनाने हृदयाशी संबंधित आजारांपासून संरक्षण मिळते.


कफाचा त्रास असेक तर चिकूचे सेवन फायदेशीर ठरते. चिकुमध्ये खास तत्व आढळतात जे श्वसन मार्गातील अडथळे दूर करतात आणि खोकल्यापासून आराम मिळतो. सर्दीमध्येही चिकू प्रभावी उपाय आहे.


मानसिक स्वास्थ्य आणि डोक शांत ठेवण्यासाठी चिकू उपयुक्त फळ आहे. यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. अनिद्रा, चिंता, आणि तणाव पिडीत लोकांनी चिकूचे नियमित सेवन केल्यास आराम मिळले.

चिकुमधिल पॉलिफेनॉलिक या घटकामुळे मूळव्याध, अन्ननलिका दाह, जुलाब अशा आजारात चिकूचे सेवन केल्यास आराम मिळू शकतो.

चिकुमध्ये जास्त प्रमाणत फायबर आढळते. गर्भावस्थेमध्ये लाभदायक कार्बोहायड्रेट आणि पोषक तत्वांची चांगली मात्रा प्राप्त करण्यासाठी चिकू लाभदायक आहे. प्रसूतीनंतर अंगावर जास्त प्रमाणात दूध येण्यासाठी हे फळ उपयुक्त आहे.


चिकुमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमणात असते. याच्या नियमित सेवनाने डोळ्यांची शक्ती वाढते. चिकुमध्ये ग्लुकोजची मात्राही चांगली असते. जे लोक जास्त काम करतात त्यांना उर्जेची जास्त आवश्यता असते. अशा लोकांनी चिकूचे नियमित सेवन करावे.
थोडे नवीन जरा जुने