अनेकांना "या" कारणामुळे लग्नच करू वाटत नाही !

मुलगा किंवा मुलगी वयात आल्यावर त्यांच्या पालकांना आपल्या मुलांची वेळेत लग्न व्हावी असं वाटत असतं. काहीजण आपल्या लग्नाची स्वप्नदेखील पाहत असतात. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, आता हे प्रमाण कमी होत चाललं आहे. लग्न करूच नये असं अनेकांना वाटतं. 


त्यामागे त्यांची अशी स्वतःची अशी कारणं आहेत. आताच्या पिढीला लग्नच्या जबाबदारीत पडू नये असंच वाटतं. याबद्दल त्यांना विचारले असता त्यांची स्वतःची अशी काही कारणंही आहेत. अनेकांना लग्नाचे विधी आणि परंपरा आवडत नाहीत. शेवटपर्यंत ते योग्य साथीदाराच्या शोधात असतात. त्यांचा शोध कधीच संपत नाही. लग्नात होणाऱ्या खर्चांचा त्यांना प्रचंड तिटकारा असतो. 

त्यामुळे एवढा खर्च करण्यापेक्षा लग्न न करणंच ते योग्य समजतात. अनेकजण करिअरला महत्त्व देतात. त्यामुळे लग्न न करण्याचा निर्णय घेतात. लग्नासारखी जबाबदारी झेलण्यात आजही अनेकजण स्वतःला अपरिपक्व समजतात. अनेकांच्या खांद्यांवर कुटुंबांची जबाबदारी असते. त्यामुळे ते लग्न करुन अजून जबाबदारीचं ओझं घेण्यास स्वतःला असमर्थ समजतात.
थोडे नवीन जरा जुने