शरीरातील 'हे' पाच भाव कधीच दाखवू नका,नाहीतर...


नकारात्मक भावनेमुळे नकारात्मक विचार वाढतात असे संशोधकांचे मत आहे. नकारात्मक विचार, भावना शारीरिक आणि मानसिक स्वरुपात व्यक्तीच्या आरोग्याचे मोठे नुकसान करतात.
कोणकोणते भाव: चिंता, क्रोध, इर्षा, राग, चुकीचे विचार, शत्रुत्व, सूड, चिडचिडेपणा, खंत आणि नैराश्य असे वाईट विचार शरीरावर विपरीत परिमाण करतात. त्याचप्रमाणे विविध आजारांना आमंत्रण देतात.

पुढील पाच भाव व्यक्तीला आजारी करू शकतात. त्यांना वेळीच ओळखून त्यावर विशेष लक्ष दिल्यास त्यांचा इलाज होऊ शकतो.


चिंता


परिणाम : पैसा, करिअर, परीक्षा किंवा आपल्या स्वकीयांविषयी चिंता होणे स्वाभाविक आहे, परंतु जास्त चिंता केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.

उपाय : कॉफी, चहा आणि साखर घेणे कमी करावे, सूप किंवा इतर पातळ पदार्थ आहारात घ्यावे.


मत्सर

परिणाम : पारंपरिक चायनीज वैद्यकीय तज्ज्ञांचे असे मत आहे की, मत्सराचा मानवी यकृत आणि जठरावर विपरीत परिणाम पडतो.

उपाय : दररोज सकाळी उठल्यानंतर गरम पाण्यात लिंबूचा रस आणि मध मिसळून प्यावे. लवकर आराम मिळेल.


चिडचिडेपणा

परिणाम : चिडचिडेपणाने विविध अँलर्जीला आमंत्रण मिळते. मन स्वस्थ राहत नाही.

उपाय : गुड फॅट म्हणजे शेंगा, मासे, ऑलिव्हचे सेवन करावे. ध्यानधारणेचा देखील यात फायदा होतो.


पश्चात्ताप

परिणाम : शरीर आणि प्रतिकारशक्ती कमकुवत होते. परिणामी अनेक आजार होण्याचा धोका संभवतो.

उपाय : चेस्टनट जास्त प्रमाणात खावे आणि संगीत ऐकण्यास प्राधान्य द्यावे.


अपराधीपणाची भावना

परिणाम : एखाद्या चुकीच्या कामाची खंत वाढत राहिल्यास त्याचा थेट परिणाम हृदयावर होतो.
उपाय : अशा त्रासातून मुक्ती मिळण्यासाठी सकाळी हिरव्या गवतावर चालावे किंवा काही वेळ त्यावर झोपावे. हे करताना कोणताही विचार मनात आणू नका.


शारीरिक समस्या

दीर्घकाळापर्यंत अपराधीपणाची भावना कायम राहिल्यास शरीराची ऊर्जा कमी होते.

शत्रुत्वाची भावना मनात दाबून ठेवल्यास शरीराच्या विविध भागांत दुखण्याचा त्रास जास्त होतो.

मानसिक तणाव झाल्यावर लोकांना डोकेदुखी आणि सर्दीचा त्रास हमखास होतो.

क्रोध, भीती किंवा तणावामुळे उच्च रक्तदाब होण्याची शक्यता वाढते.

डॉक्टर मानतात की कॅन्सर, हृदयविकार आणि इन्सोम्नियासारख्या आजारांचे मूळ कारण नकारात्मक भावना आणि विचार हेच असतात.


मानसिक समस्या

नकारात्मक भावनांना वेळीच मनातून दूर केले नाही तर मोठय़ा आणि गंभीर समस्या निर्माण होऊ शकतो.

नकारात्मक भावनांमुळे व्यक्ती एखाद्या कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. मन सदैव अस्वस्थ राहते.

नकारार्थी विचारामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो आणि तो कोणतेही काम चांगल्याप्रकारे विश्वासाने पूर्ण करू शकत नाही.

भीती, तणाव आणि खंत यांसारख्या भावना असुरक्षिततेची भावना निर्माण करते. अशाने व्यक्तीमधील आत्मविश्वास कमी होतो.
थोडे नवीन जरा जुने