तणावात आणि चिंताग्रस्त असताना आहारात करा ह्या गोष्टींचा समावेश,होईल फायदा !


आज प्रत्येकच व्यक्ती तणावात असतो. अनेकदा हा तणाव वाढतो. अशा वेळी तहानभूक विसरली जाते. त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. अशा वेळी आहारावर लक्ष देणं गरजेचं असते. मुळात तणाव आणि चिंताग्रस्त असताना आहार चांगला असायला हवा असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

दही: 
तणावात असताना दह्याचा वापर करण्याची प्रथा आपल्याकडे प्राचिन काळापासून आहे. आजही परीक्षेला जायच्या आधी मुलांना दही दिलं जातं. दह्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात, प्रोटिन्स हारमोन्सला बुस्ट करते त्यामुळे मन प्रसन्न होण्यास मदत होते.

जवस: 
जवसमध्ये ओमेगा-3 ची मात्र असते. ओमेगा 3 हे मेंदूमधली सरोटिनचं प्रमाण वाढवते. सरोटिन हे मनाला तरतरी देते आणि तणाव दूर करण्यास मदत करते.

सॉल्मन मासा: 
सॉल्मन माशाला ओमेगा 3 चं भंडार मानलं जातं. ओमेगा 3 हे मेंदुला बुस्ट करण्याचं काम करतं. तसंच यात विटॅमिन ई देखील असते. त्यामुळे सोल्मन फिश हा एक चांगला उपाय मानला जातो.

स्ट्रॉबेरी: 
स्टॉबेरीमध्ये ऍन्टीऑक्सीडेंटची मात्रा मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे तणाव दूर होण्यास मदत होते. तसंच स्ट्रॉबेरी हे दिसायला आकर्षक असते त्यामुळे त्याचा रंग मनाला प्रफुल्लीत करतो.

अंडे: 
अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटिन्स आणि ट्रायोफोटॉन असते जे तणाव दूर करण्यास मदत करते.

रताळ: 
रताळामध्ये प्रोटिन्स आणि ऍन्टीऑक्सिडेंट आहे. जे नर्वला शांत करते. तसंच यातील काही तत्व हे मेंदुच्या पेशींना पोषण देण्याचं काम करते.

पालक: 
पालकमध्ये आयर्न आणि मॅग्नेशियमची मात्र अधिक असते. तसंच यात मिनरल्सदेखील असते, जे हॉर्मोन्सला प्रवाही ठेवते. त्यामुळे तुमचं मन फ्रेश होण्यास मदत होते.
थोडे नवीन जरा जुने