जेवानासंदर्भात ह्या गोष्टी लक्षात असल्याच पहिजे...


मेंदू हा आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे तर पोट आपल्या आरोग्याचा केंद्रबिंदू आहे.
पोटाच्या समस्यांमुळे आज अनेकजण त्रस्त आहेत. सर्व रोगांचे मूळ पोटात असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेवटी पोटालाच शरण जावे लागते. मेंदू हा आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे तर पोट आपल्या आरोग्याचा केंद्रबिंदू आहे. अनियमीत खाणेपिणे आणि अनिश्चित दिनचर्या यामुळे पोटाच्या समस्या उद्भवणे आज नेहमीचेच होऊन बसले आहे.


पोटात गॅस तयार होणे, बद्धकोष्ठता आदी समस्या पोटाशी निगडीत आहेत. पोटात गॅस होण्याची समस्या कदाचित खूपच छोटी समस्या वाटेल, परंतु ही समस्या घातक परिणाम करू शकते. पोटाच्या या समस्यांवर मात करण्यासाठी पुढील गोष्टी सदैव ध्यानात ठेवा.

- कडाडून भूक लागल्यावरच जेवण करा.

- जेवण केल्यानंतर लगेच चहा किंवा कॉफी आदी पेय घेऊ नका.

- पिकलेले बेलफळ योग्य रीतीने खा. 

- हिंगाष्टक चूर्ण बाजारात सहज उपलब्ध आहे. जेवल्यानंतर नियमितपणे हे चूर्ण घ्या.

- जेवणात हिरव्या पालेभाज्या आणि सॅलडचा समावेश करा. चहा, मिर्च मसाला आदी पदार्थ पचायला जड आहेत. 

- जेवल्यानंतर वज्रासनात बसा. रात्री डाव्या अंगावर झोपा. 

- रोज सकाळी 2/3 किलोमीटर मॉर्निंग वॉक करा.

- सकाळी उठल्यावर 1/2 ग्लास पाणी प्या. तांब्याच्या भांड्यातील हे पाणी असल्यास चांगले.

थोडे नवीन जरा जुने