मधाचे आणि तिळाचे एकत्रित सेवन केल्यास शरीराला होतील हे होतील फायदे !



मधाला सुपर फूड आणि औषधी मानले जाते. हे पदार्थ आरोग्यासंबंधीत अनेक समस्या दूर करण्यात मदत करते. यामध्ये अनेक व्हिटॅमिन आणि मिनरल असतात. मध हे गळ्याच्या इनफेक्शनमध्ये मदत करते. 

वजन कमी करण्यासाठी आणि डायबिटीजच्या रुग्णांसाठी याचा उपयोग केला जातो. कारण हे गोड असले तरी इतर पदार्थांपेक्षा जास्त सुरक्षीत आहे. जेव्हा मध आणि तीळ एकत्र केले जातात. तेव्हा याचे आरोग्यदायी फायदे खुप वाढतात. 

तीळ आरोग्यासाठी फायदेशीर असतात कारण हे शरीरात कोलेस्ट्रॉलला नियंत्रित आणि कमी करतात. हे ब्लडप्रेशर नियंत्रित करण्यात मदत करते. परंतु जेव्हा मध आणि तीळ एकत्र केल्या जातात तेव्हा हे 10 समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर असते. 

हे दोन्ही पदार्थ शरीराला अनेक प्रकारचे पोषकतत्त्व प्रदान करतात. एकत्र केल्यावर हे अधिक ऊर्जा देतात ज्यामुळे आपण दैनंदिन कामे सुरळीत करु शकतो. 

विशेषज्ञ सल्ला देतात की, तीळ आणि मधाचे नियमित सेवन करावे. हे आपल्याला फिट आणि निरोगी ठेवतात. चला तर मग जाणुन घेऊया तीळ आणि मधाच्या फायद्याविषयी...

इम्यूनिटी पावर वाढवण्यासाठी

मध आणि तीळाचे मिश्रण इम्यूनिटी वाढवण्यासाठी फायदेशीर असते. मधामध्ये असलेले गुण रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यात सहाय्यक असतात. तीळ हे शरीरातील हानिकारक बॅक्टेरिया आणि व्हायरस वाढू देत नाही.

गोड खाणा-यांसाठी

ज्या लोकांना गोड पसंत आहे त्यांच्यासाठी मध एक चांगला पर्याय आहे. ज्या पदार्थामध्ये मोठ्या प्रमाणात मध आहे असे पदार्थ जास्त खावे कारण हे फक्त वजन नियंत्रित करत नाही तर आरोग्यासाठी देखील चांगले असते.

वेदना दूर करण्यात मदत करते
तीळ आणि मधाला एकत्र खाल्ल्याने पोटदुखीपासुन आराम मिळतो. पीरियड्सच्या वेळी होणा-या वेदना कमी करण्यासाठी हे खुप फायदेशीर असते. तीळामध्ये आयरन मोठ्या प्रमाणात असते. हे पीरियड्सला नियमित करण्यात साहाय्यक असतात.

पोटाचे आजार दूर करण्यासाठी फायदेशीर

मध आणि तीळ एकत्र खाल्ल्याने पोटासंबंधीत आजाराचा उपचार केला जातो. मधामध्ये अँटीऑक्सीडेंट असतात जे पोटाचे रक्षण करतात. हे तीळ पोटातील अल्सरला दूर करण्यात साहाय्यक असतात.

हाडांना मजबूत करते

या दोन्हीही पदार्थांमध्ये समान प्रमाणात कॅल्शियम असते, जे हाडांना मजबूत करतात. हे नियमित खाल्ल्याने हाडे लवकर कमकुवत होत नाही.

मेंदूसाठी फायदेशीर

काही खाद्य पदार्थ असे असतात जे मेंदूसाठी फायदेशीर असतात. मध देखील खुप फायदेशीर असते. मध आणि तीळ ब्रेनला ऊर्जा प्रदान करते तसेच प्रेरक पेशीच्या विकासात देखील सुधारणा करतात. लहान मुलांनी रोज एक चमचा मधाचे सेवन केले पाहिजे.

ऊर्जा प्रदान करते

तीळ आणि मधामध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा असते. जेव्हा हे दोन्ही पदार्थ एकत्र केले जातात तेव्हा खुप जास्त प्रमाणात ऊर्जा एकत्र येते. ही ऊर्जा दैनंदिन कामे पुर्ण करण्यासाठी सहाय्यक असते.

कोलेस्ट्रॉल कमी करते

तिळाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करते. मध आणि तीळाचे मिश्रण सलाड किंवा डिजर्टवर टाकून देखील खाता येऊ शकते. कच्चे तीळ देखील खाता येऊ शकतात.

मधुमेहाच्या रोग्यांसाठी

टाइप 2 चे डायबिटीज थांबवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात तीळ अवश्य सेवन करावे. डायबिटीजच्या रोग्यांसाठी साखरे ऐवजी मधाचा वापर केला पाहिजे.

किडनीसाठी उत्तम आहार

मध आणि तीळ किडनीच्या देखरेखीसाठी फायदेशीर असते. या दोन्ही घटकांच्या नियमित सेवनाने किडना स्टोन दूर करण्यात मदत केली जाऊ शकते.
थोडे नवीन जरा जुने