कामाचे नियोजन अशाप्रकारे करा म्हणजे वेळेचा दुरुपयोग होणार नाही

कार्यमग्न राहिल्याने तुम्हाला गरज पडल्यावर त्यात बदल करणे शक्य होत नाही. त्यासाठी पहिल्यापासून काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. कामाचे नियोजन करताना त्यात ऐनवेळी बदल करण्यासाठी वाव ठेवला पाहिजे. 


अशा प्रकारे नियोजन केल्यास तुम्ही वेळेचा सर्वात चांगला सदुपयोग करू शकता. काही वेळी एकीकडे महत्त्वाच्या कामांसाठी वेळ देऊ शकत नाही. दुसरीकडे आपला वेळ इतर कामांमध्ये, बैठकीत वाया जातो हे टाळता येते.

आपल्या शरीराची कार्यशैली ओळखा 

काही लोकांना सकाळच्या वेळी तर काही लोकांना रात्रीच्या वेळी काम करण्यास उत्साह येतो. आपल्या शरीराची कार्यशैली ओळखून त्या आरे उत्पादक आणि क्षमतापूर्ण काम करता येईल. मन:शांती करणे आणि आपल्याला अधिक ताजेतवाने ठेवण्यासाठी आवश्यक ती कामे केली पाहिजेत.

आपल्या दिनक्रमाची माहिती द्यावी 

दिनक्रमानुसार कामे होण्यासाठी आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांना तसेच कार्यालयातील सहकार्याना दिवसभरातील कामांची संपूर्ण माहिती दिली पाहिजे. अशा प्रकारे इतरांना माहिती दिली तर त्यानुसार कामांची विभागणी होऊ शकेल आणि त्यातून तुमच्या व इतर सहकाऱ्यांच्या वेळेचाही सदुपयोग होऊ शकेल.

अना‌वश्यक बैठकींपासून दूर राहा

 काही कंपन्यांमध्ये बैठकींना जास्त महत्त्व दिले जाते. त्यातील अनेक बैठका या अशा असतात की, त्या फोनवरही होऊ शकतात. अशा अनावश्यक बैठकांमुळे आपले स्वत:च्या कामावर लक्ष लागत नाही. बैठका महत्त्वाच्या नसतील तर त्यासाठी नाही म्हणायला घाबरू नका.
थोडे नवीन जरा जुने