पाप करणे म्हणजे काय ? अतृप्ती हा वासनांपूर्तीचा परिणामपाप करणे म्हणजे वासनांच्या मागे लागून त्या पूर्ण व्हाव्या म्हणून प्रयत्न करणे होय. पण हा मुद्दा पण महत्वाचा आहे की वासना कधीच शमत नाहीत .अतृप्ती हा वासनांपूर्तीचा परिणाम आहे . 

ह्या अतॄप्त वासना जर एका जन्मात शमल्या नाहीत तर त्या पूर्ण करण्या करता जे शरीर योग्य असेल तस जन्म परत येतो. नवा जन्म माणसाचाच जन्म येईल असेही म्हणता येत नाही. म्हणुन तुकाराम महाराजांनी म्हटले आहे की पाप केल्यामुळे जन्म येतो.

पण कांही वासना चांगल्या पण असतात. भगवद्‍भेटिची वासना ही नक्कीच चांगली म्हणता येते. अशी वासना असणारी व्यक्ती भगवद्‌भक्ती, लोकांची सेवा करणारी असते. जर ही वासनापूर्ती एका जन्मात झाली नाही तर अशी व्यक्ती चांगल्या कुळात जन्म घेते व पुढच्या जन्मी त्याची भगवद्‌भेटीची वासनापूर्ती होते. एकदा कां भगवद्‍भेट झाली की त्याच्याशी ऐक्य घडल्यामुळॆ अशी व्यक्ती जन्म मृत्यातीत होते. ह्यालाच नरजन्माचॆ सार्थक करणे म्हणतात.

श्रीमद्‍ भगवद्‌गीतेमधे ह्याबद्दल स्वतभगवतानेच  व्या अध्याय ह्याची ग्वाही दिली आहे

असे स्वत:च्या नरज्न्माचे सार्थक न करणे म्हणजेच स्वत:ची हानीच करणे होय. 

पापपुण्य करूनी जन्मा येतो प्राणी  नरदेही येऊनी हानी केली 
थोडे नवीन जरा जुने