समोरच्याचे ऐकून घेऊन मगच तुमची प्रतिक्रिया द्या...कुणी दु:खाने प्रश्न विचारत असलेले दिसले तर फक्त ऐकून त्यांना फक्त कुणीतरी ऐकून घ्यायला हवे असते. 
जरा ऐकायला शिका पृथ्वीवरच्या प्रत्येक महान शोधाच्या मागील स्फुल्लिंग म्हणजे जिज्ञाना. जिज्ञासा बहिर्मुख असते. म्हणजे हे काय आहे, हे कसे झाले, तेव्हा ते विज्ञान असते, तीच अंतर्मुख होते म्हणजे मी कोण आहे, मी ईथे कशासाठी आहे. आदी प्रश्न निर्माण होतात, तेव्हा ते अध्ययन असो, बहुतेक वेळा शोकाकुल असताना लोकांना प्रश्न पडतो हे माझ्या बाबतीत का घडते.मी असे काय केले म्हणून हे माझ्या वाट्याला आले. कुणी दुखाने प्रश्न विचारत असलेले दिसले तर फक्त ऐकून घ्या. त्यांना फक्त कुणीतरी ऐकून घ्यायला हवे असते, खरे तर उत्तर वगैरे नको असते. अनेकदा लोक रागवले असतात.मी बरोबर असताना मग माझ्यावर का आरोप केले जात आहे. असे का हे आदी प्रश्न रागच्या भरात निर्माण होतात.इथे देखील ते त्यांच्या भावनांच्या भोव-यात अडकलेले असतात आणि असे प्रश्न विचारून ते स्वत : चे समर्थन करत असतात. 

अशाळी तुम्ही काहीही उत्तर दिले तरी ते त्यांच्य डोक्यात शिरत नाही. याउलट त्यातुन आणखी प्रश्न निर्माण होतात काही लोक प्रश्न विचारतात ते केवळ त्याचे अस्तित्व इतरांना जाणवून देण्यासाठी. उत्तर मिळवण्यापेक्षा, प्रश्न विचारून इतरांचे लक्ष वेधून घेण्यातच त्यांना समाधान असते. काहीजण समोरच्याला खरेच माहित आहे की नाही याची परीक्षा घेण्यासाठी प्रश्न विचारतात. त्यांना उत्तर मनोमन आधीच माहीत असते. त्यांच्या उत्तराशी ते त्यांना जोडून पाहायचे असते.ज्यांना मनापासून काहीतरी जाणून घ्यायचे असते ते लोक मनापासून प्रश्न विचारतात. आणि त्यांचा मिळणाऱ्या उत्तरावर विश्वास असतो. फक्त अशा प्रकारच्या प्रश्नांना उत्तर द्यावीत. कार्यालयत अथवा आजूबाजूला जे लोक प्रश्न विचारुन तुम्हाला भंडावून सोडत असतील तर ते शांतपणे ऐकून घ्या.
थोडे नवीन जरा जुने