निकाल लावण्याआधीच बाळ जन्माला घालायचे ठरलं होते !


पुणे : शिवसेना खासदार संजय राऊत यांची आज पुण्यात प्रकट मुलाखत झाली. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी विविध मुद्द्यावर रोखठोक मतं व्यक्त केली. काँग्रेसबाबत बोलताना संजय राऊत यांनी स्तुतीसुमनं उधळली.
“आम्ही त्यावेळी सोनियावर टीका केली. काळाच्या ओघात केली. शरद पवारांनी त्या मुद्द्यावर पक्ष स्थापन केला. त्यांचे वय 70 झाले आहे. काँग्रेस पक्ष हा परदेशी पक्ष नाही ना ? काँग्रेस पक्ष ही स्वातंत्र्य संग्रामाची ठिणगी आहे. काँग्रेसशिवाय स्वातंत्र्य इतिहास लिहला जाऊ शकत नाही”, असं संजय राऊत म्हणाले.

काँग्रेस, राष्ट्रवादी हे पाकिस्तानमधले पक्ष आहेत का ? माझी शरद पवार यांच्यावर श्रद्धा आहे. या सरकारला कुणी खिचडी म्हणत नाही. निकाल लावण्याआधीच बाळ जन्माला घालायचे ठरलं होते, असं म्हणत संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केला.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अंदाज आला होता की भाजप शब्द पाळणार नाही. दिल्लीत वातावरण फार आशादायक आहे असं वाटत नाही. लोकांच्या मनातील भीती दूर करणे हे सामुदायिक काम आहे, असं संजय राऊत यांनी नमूद केलं.
थोडे नवीन जरा जुने