नाशिकचा जवान काश्मिरात शहीद


नाशिक जिल्ह्यातील आडगाव येथील जवान अप्पासाहेब मधुकर मते यांचा काश्मीरमध्ये हृदयविकाराने मृत्यू झाला. ते सीमा सुरक्षा दलात हवालदार पदावर कार्यरत होते. गेल्या १५ वर्षांपासून ते सीमा सुरक्षा दलात सेवा बजावत होते. गुरुवारी (दि. ९) त्यांचे पार्थिव नाशिकला येणार आहे. 

आडगाव मेडिकल फाटा येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिली. अाडगाव येथील मेडिकल फाटा येथे त्यांची आई म्हाळसाबाई, भाऊ भगीरथ, पत्नी मनाषा आणि मुलगा प्रताक (११) असे कुटुंबीय वास्तव्यास आहे. शालेय जीवनापासून त्यांना देशसेवेची आवड होती. त्यांनी कराटेचे प्रशिक्षण घेत ब्लॅक बेल्ट मिळवला होता. २००५ मध्ये सीमा सुरक्षा दलात भरती झाले. १५ वर्षांच्या सेवेत त्यांनी आसाम, सिमला, लखनऊ, नवगड, नेपाळ सीमा येथे सेवा बजावली.
थोडे नवीन जरा जुने