सुंदर आणि गुलाबी ओठांसाठी हे उपाय करा !


अधिक प्रमाणात सौंदर्य प्रसाधने वापरल्यानेही ओठांचे सौंदर्य नष्ट होते.
कोणत्याही व्यक्तीचे बाह्यसौंदर्य हे त्या व्यक्तीच्या ओठांवरूनही ठरत असते. मुलगा असू द्या की मुलगी, सुंदर ओठांमुळे व्यक्तिमत्त्व आकर्षक बनते. परंतु काही लोकांचे ओठ हे नैसर्गिकरीत्याच काळे असतात. किंवा काही लोकांचे ओठ सतत फाटतात किंवा ओठांना चीर पडते. अधिक प्रमाणात सौंदर्य प्रसाधने वापरल्यानेही ओठांचे सौंदर्य नष्ट होते. येथे काही अतिशय साधे घरगुती उपाय आहेत. या उपायांनी तुमच्या ओठांचे सौंदर्य निश्चितच वाढेल.


उपाय


- ओठांचे पापुद्रे निघत असतील, ओठांना चीर पडत असतील तर रात्री झोपताना ओठांना बदाम तेल लावा.

- झोपताना ओठांना खोबरेल तेल लावल्यास ओठ कोमल होतात.

- दही, लोणी यात केसर मिसळून ओठांना लावल्याने ओठ हळू हळू गुलाबी होतात. 

- ओठांचा कोरडेपणा घालवण्यासाठी दुधाच्या साईत हळद मिसळून ओठांवर हळूवारपणे मालिश करा.

- ओठ फाटण्यावर रामबाण उपाय म्हणजे मोहरीचे तेल किंचित गरम करून रात्री झोपताना नाभीवर लावा. हा आयुर्वेदिक उपाय अतिशय चमत्कारी आहे. 12 तासात परिणाम दिसतील.

थोडे नवीन जरा जुने