"ह्या" पदार्थांचे नियमित सेवन दातांसाठी नुकसानदायक ठरू शकते....


सुंदर स्माईलमुळे कोणाच्याही सौंदर्यात आणखीनच भर पडते. सुदर स्माईलसाठी दात सुंदर असणे आवश्यक आहे. दात नेहमी सुंदर आणि मजबूत ठेवण्यासाठी त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. 

खूप प्रयत्न करूनही तुमचे दात पिक्चर परफेक्ट नसतील तर तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. खाण्याचे काही पदार्थ असे असतात ज्यामुळे दातांचे नुकसान होऊ शकते. आपण नकळतपणे त्या पदार्थांचे सेवन करत असतो. 

आज आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांची माहिती देत आहोत, ज्यांचे नियमित सेवन दातांसाठी नुकसानदायक ठरू शकते....

करी - 

हे एक चविष्ट भारतीय व्यंजन आहे, परंतु यामध्ये मसाल्याचा उपयोग अधिक प्रमणात केला जातो. त्यामुळे हा पदार्थ खाल्यानंतर दातांवर डाग पडतात. या समस्येपासून दूर राहण्यासाठी प्रभावी उपाय म्हणजे, जेवण केल्यानंतर पाण्याने चांगल्याप्रकारे चूळ भरा. यामुळे दातांची मुळं कमकुवत बनतात. चूळ भरल्याने हे अ‍ॅसिडसदृश्य पदार्थ निघून जातात.स्वीट ब्रेड आणि बिस्किट्स - 

स्वीट ब्रेड आणि बिस्किट्स जास्त प्रमाणात खाणे दातांसाठी नुकसानदायक आहे. यामध्ये साखर आणि मैद्याचे अधिक प्रमाण असते. या दोन्ही गोष्टींमुळे दातांमध्ये कॅव्हिटी होऊ शकते. यामुळे ब्रेड, बिस्कीट जास्त प्रमाणात खाऊ नयेत.


टोमॅटो सॉस - 

टोमॅटो सॉसमुळे तुमचे जेवण आणखीनच चविष्ट बनते, परंतु जास्त प्रमणात टोमॅटो सॉस खाल्ल्याने दातांवर डाग पडतात. यामुळे दात पांढरेशुभ्र ठेवण्यासाठी टोमॅटो सॉस कमी प्रमाणात खाण्याचा प्रयत्न करावा.


लोणच - 

विकतच्या लोणच्यामध्ये व्हिनेगर असते. व्हिनेगर जास्त अ‍ॅसिडीक असते त्याचबरोबर लोणच्यामध्ये साखर असेल तर ते अधिक अ‍ॅसिडीक होते. यामुळे दातांना मजबूत ठेवण्यासाठी जास्त प्रमाणात लोणच खाण्याचा मोह टाळावा.


पॉपकॉर्न - 

पॉपकॉर्नमध्ये विविध प्रकारचे पोषक तत्व असतात परंतु दातांसाठी हे हानिकारक आहे. पॉपकॉर्न दातांमध्ये अडकते त्यामुळे दातांना नुकसान होऊ शकते. पॉपकॉर्न खाल्यानंतर दात ब्रशने अवश्य घासावेत.


सफरचंद - 

सफरचंदमध्ये अ‍ॅसिडचे प्रमाण अधिक असते. दररोज एक सफरचंद खाल्ल्याने डॉक्टरकडे जाण्याची गरज पडत नाही असे म्हणतात, परंतु दररोज जास्त सफरचंद खाल्ल्यास तुम्हाला लवकरच डॉक्टरकडे जाण्याची गरज भासू शकते. यामागचे कारण म्हणजे सफरचंद अ‍ॅसिडीक असणे. जर तुम्ही दररोज सफरचंद खात असाल तर त्यानंतर ब्रश अवश्य करावा.


डार्क सोडा - 

डार्क सोडा दातांसाठी हानिकारक आहे, कारण यामध्ये कृत्रिम रंग असतात. कृत्रिम रंगामुळे दातांवर डाग पडतात. जेव्हा तुम्ही सोडा पिता त्यानंतर शरीराचे तापमान वाढते, जे दातांसाठी ठीक नाही आणि यामुळे दातांवर डाग पडतात.


सॅलड - 

सॅलड आरोग्यासाठी खूप लाभदायक मानले जाते. हे दातांसाठीही खूप चांगले आहे, परंतु सॅलडमध्ये व्हिनेगर आणि साखरचे फ्लेवर मिसळून याचे सेवन केल्यास दातांसाठी हानिकारक ठरू शकते.
थोडे नवीन जरा जुने