नैराश्य, निद्रानाश, भीती अशा अनेक मानसिक समस्यांमध्ये "ही" उपचार पद्धती प्रभावी ठरते.


नैराश्य, निद्रानाश, भीती अशा अनेक मानसिक ताणतणावाच्या समस्यांमध्ये संगीत ही प्रभावी उपचार पद्धती ठरते. वेट ट्रेनिंग, जॉगिंग, सायकलिंग यावेळी संगीत ऐकण्याचा प्रयत्न करा. 

शरीरामध्ये सात चक्र असतात. त्यामध्ये बिघाड झाल्यास आजारपण वाढते. चक्राची सुरुवात डोक्यापासून मानेच्या मणक्यापर्यंत असते. तुमच्या मानसिक भावनांमध्ये चढ - उतार झाल्यास चक्रांवरही त्याचा परिणाम होतो. परिणामी रोग जडायला सुरुवात होते. 

संगीतामुळे शरीरातील सातही चक्रांमध्ये सुसंगती निर्माण होण्यास मदत होते. परिणामी अनेक समस्यांना दूर ठेवण्यास मदत होते. चांगल्या संगीतामुळे न्युरोलॉजिकल समस्यांना आटोक्यात आणण्यास मदत होते. नैराश्य, निद्रानाश, भीती अशा अनेक मानसिक ताणतणावाच्या न्युरॉलॉजिकल समस्यांमध्ये संगीत ही प्रभावी उपचार पद्धती ठरते. यामुळे मेंदूचे कार्य सुधारते तसेच आनंदी ठेवणारे एन्डॉरफिन हार्मोन्सचा प्रवाह सुधारतो. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. हिप हॉप संगीत प्रकार मेंदूच्या कार्याला चालना देतात. स्क्रिझोफेनिया, डीप्रेशनचा त्रास कमी करण्यासाठी संगीत निश्चितच फायदेशीर ठरते, असा सल्ला केम्ब्रिज युनिव्हर्सिटीचा अहवाल सांगतो. 

जर्नल ऑफ अ‍ॅडवान्स नर्सिंगच्या अभ्यासानुसार शास्त्रीय संगीत हा निद्रानाशावरील एक सहज सोपा आणि प्रभावी उपाय आहे. रात्री पुरेशी आणि शांत झोप न मिळाल्यास दिवसा थकवा, सुस्ती येण्याचे प्रमाण वाढते. नैराश्याचे प्रमाण वाढते. संगीत ऐकल्याने नसा आणि स्नायूदेखील शांत होण्यास मदत होते. तसेच मनाची अस्वस्थता , रक्तदाब , श्वसनाची गती सुधारते . तसेच शांत झोप येण्यास मदत होते
थोडे नवीन जरा जुने