या सिगरेटचा पहिला झुरका तुमच्यासाठी अतिशय धोकादायक, 'हे' होतील भयंकर परिणाम
अनेक जण हे तरुणपणातच सिगरेटच्या आहारी जातात. पण सिगरेटचा पहिला झुरका तुमच्यासाठी अतिशय धोकादायक ठरू शकतो. सिगरेटमुळे तुमच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होतात. फक्त कूल दिसण्यासाठी जेव्हा तरुण सिगरेट पितात. पण पुढे याच गोष्टी सवय जडते आणि ती सोडणंही फार जड जातं.

सिगरेट आरोग्यासाठी हानिकारक आहे... असं सिगारेटच्या पाकिटावर मोठ्या अक्षरात लिहलेलं असतं. पण आपण सिगरेट पिणारे त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतात. अनेक तरूण हे फक्त 'कूल' दिसावं यासाठीच सिगरेट पित असल्याचं एका रिसर्चमधून समोर आलं आहे. जर आपणही सिगरेटच्या आहारी गेला असाल तर सिगरेटचा प्रत्येक कश हा तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. जाणून घ्या सिगरेटमुळे होणारे दुष्परिणाम.

प्रत्येक कशचा तुमचा पोटावर होतो परिणाम


सिगरेटचा धूर हा आपल्या शरीरातील आवश्यक अशा बॅक्टेरियावर परिणाम करतो. यामुळे पोषक तत्वांची प्रोसेसिंग काही काळासाठी थांबून जाते. धूम्रपानामुळे पोटातील आम्ल वाढतं. त्यामुळे सकाळी-सकाळी सिगरेटची तुम्हाला तल्लफ लागते. त्याने तुमची भूक कमी होते. याचा वाईट परिणाम तुमच्या पोटावर होतो.

फुफ्फुसावर होतो वाईट परिणाम

फुफ्फुस हे आपल्या शरीरात फिल्टरचं काम करतं. फुफ्फसात असणाऱ्या कोट्यावधी छिद्रातून दिवसाला दररोज २० लाख लीटर हवेची गाळणी होते. पण सिगरेटच्या धुरामुळे फुफ्फुसातील अनेक छिद्र बंद होतात.

हृदयाचे ठोके वाढतात

माणसाच्या हृदयाचे हे दर मिनिटाला ७२ वेळा ठोके पडतात. पण सिगरेटच्या सेवनानंतर हृदयाचे ७५ ठोके पडतात. म्हणजेच सिगरेटचा एक कश घेतल्यानंतर तुमच्या हृदयाचे नेहमीपेक्षा तीन ठोके अधिक पडतात. एवढंच नाही, तर यामुळे तुम्ही लवकर थकता. म्हणजेच तुमचा स्टॅमिना कमी होतो.

छातीत कफ जमा होतो

सिगारेटमधील कार्बन मोनोऑक्साइडमुळे तुमच्या गळ्यात खवखव सुरू होते. यामुळे बऱ्याचदा सिगेरट पिणाऱ्यांना वारंवार कफ होतो. त्यामुळे याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

...म्हणून सिगरेटची सवय तुम्हाला जडते !

सिगरेटच्या प्रत्येक कशमुळे तुमच्या रक्तात निकोटन मिसळत जातं. ज्याचा परिणाम हळूहळू तुमच्या मेंदूवरही होतो. अनेकांना यावेळी वाटतं की, यामुळे आपल्याला आनंद मिळतो. यातूनच सिगरेटची सवय जडते.

'कूल' दिसण्यासाठी सिगरेट पितात

एका इंश्युरस कंपनीने १००० तरुणांवर एक ऑनलाइन सर्व्हे केला. यात अशी माहिती समोर आली की २० ते ३५ वयोगटातील तरूण २३ टक्के तरूण हे फक्त 'कूल' दिसण्यासाठी सिगरेटचं सेवन करतात. तर ३५ ते ५० वयोगटातील लोकं हे तणावामुळे सिगरेट पीत असल्याचं सांगतात.सिगरेटच्या पहिल्याच कशचे आरोग्यावर होतात 'हे' भयंकर परिणाम!  
थोडे नवीन जरा जुने