रात्री तुमची झोप मोडणार नाही,लक्षात ठेवा ह्या गोष्टी!


झोपेशी संबंधित समस्यांसाठी अनियमित जीवनशैली, अयोग्य खान-पान, तणाव, मोबाइल फोन आणि खोलीतील वातावरण आदी बाबी बºयाच अंशी जबाबदार असतात. जाणून घेऊया ही कारणे शास्त्रीयदृष्ट्या झोपेवर कसा परिणाम करतात आणि त्यापासून कसा बचाव करता येईल. 

झोपण्यापूर्वी 
रात्रीच्या वेळी किंवा झोपण्यापूर्वी पचण्यास जड असलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन करू नये. डिनर आणि झोपेच्या मध्ये सुमारे दोन ते तीन तासांचे अंतर असणे आवश्यक आहे. याउलट जर तुम्हाला झोपण्यापूर्वी भूक लागत असेल तर लाइट स्नॅक्सचे सेवन करावे. कॉफी किंवा गोड पदार्थांचे सेवन करू नये. तसेच रात्रीच्या वेळी खूप जास्त अल्कोहोलचे सेवन करू नये. यामुळे डिहायड्रेशनची शक्यता वाढते आणि रात्रीची झोपही मोडते. झोपण्या-उठण्याच्या वेळा नेहमी ठरलेल्या असाव्यात, जेणेकरून शरीर आणि मेंदूला याची सवय लागेल. 

चिंता करू नये 
झोपण्यापूर्वी वायफळ चिंता डोक्यातून काढणे आवश्यक आहे. कारण यामुळे झोप मोडते. जर तुम्ही चिंताग्रस्त असाल तर झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने आंघोळ करावी आणि हलके संगीत ऐकावे. झोपण्यापूर्वी कधीही व्यायाम करू नये. कारण यामुळे झोप येत नाही आणि ऊर्जाही कमी मिळते. दिवसा शरीराची ऊर्जा पातळी अधिक असते. त्यामुळे रात्रीच्या तुलनेत कॅलरी चांगल्या रीतीने जळते. 

खोलीतील वातावरण 
हिवाळ्यात प्रत्येकजण घराचे खिडकी-दरवाजे बंद ठेवणेच पसंत करतात, परंतु असे केल्याने घरात जास्त धूळ जमा होते. जेव्हा हे धुळीचे कण ओलाव्याच्या संपर्कात येतात तेव्हा घरातील वातावरण दूषित होते. अशावेळी महिन्यातून एकवेळ उशी आणि गादी उन्हात ठेवावी आणि त्यांचे कव्हर गरम पाण्याने धुवावेत. याशिवाय पथदिव्यांचा प्रकाश खोलीतील खिडक्यांतून येऊ देता कामा नये. कारण यामुळेही झोप मोडते. 
वेळ निश्चित असावी 

झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित असणे खूप आवश्यक आहे. जर विकेंड किंवा सुटीच्या दिवशी  
उशिरापर्यंत झोपत असाल तर यामुळे स्लीपिंग पॅटर्न बिघडतो. तसेच जे लोक वारंवार घड्याळीचा गजर बंद करून पुन्हा झोपतात त्यांच्यासाठी ही सवय घातक ठरू शकते. या सवयी झोपेशी संबंधित समस्यांसाठी जबाबदार आहेत. त्यामुळे वेळेवर झोपावे आणि वेळेवर उठावे. 

इकडेही लक्ष द्या 
40 टक्के लोकांना अत्यंत मऊ गादी किंवा उशीचा वापर केल्यामुळे पाठदुखीचा त्रास होण्याची शक्यता वाढते.
16 ते 18 डिग्री खोलीतील तापमान चांगल्या झोपेसाठी खूप आवश्यक आहे. अन्यथा झोप मोडणे निश्चित आहे.
झोपताना मोबाइल फोन बंद करून ठेवावा. तसेच रात्री उशिरापर्यंत संगणकावर गेम खेळणे आणि नेट सर्फिंग करणे यासारख्या सवयी सोडल्या पाहिजेत. कारण संगणकाच्या प्रकाशाने मेलाटोनिन हार्मोनची सक्रियता बाधित होते. हा हार्मोन चांगल्या झोपेसाठी खूप आवश्यक आहे.
थोडे नवीन जरा जुने