आमची गाडी घसरणार नाही याची आम्हाला खात्री होती....


मुंबई : आमची गाडी घसरणार नाही याची आम्हाला खात्री होती, सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेच योग्य आहेत, तर अजित पवार स्टेपनी आहेत, असं म्हणत ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांनी हशा पिकवला. अजूनही मला पत्रकार म्हणवून घेणं पसंत आहे, नेता आणि खासदार नाही, माझी तीच ओळख कायम असावी, असं राऊत म्हणाले. 

आम्हाला राज्य चालवण्याचा उत्तम अनुभव आहे. पुढल्या पाच वर्षात काय करायचं हे आमचं ठरलं आहे. शरद पवार यांनी आदर्श सरकार चालवायचं ठरवलं होतं. प्रत्येकाच्या इच्छेतून हे सरकार निर्माण झालं आहे. पडद्यामागच्या गोष्टी पडद्यामागे राहू द्या, असंही संजय राऊत म्हणाले. कोणतंही खातं कमी जास्त महत्वाचं नसतं, सर्व खाती महत्वाची असतात, आम्ही खाणारी खाती आमच्याकडे घेतलीच नाहीत, अशी कोपरखळीही राऊतांनी दिली.

आमची गाडी घसरणार नाही याची आम्हाला खात्री होती, सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेच योग्य आहेत, तर अजित पवार स्टेपनी आहेत, स्टेपनीसुद्धा महत्त्वाची असते. स्टेपनी नसेल तर लांबचा प्रवास करता येऊ शकत नाही. अजित पवारांना घेऊन गेले त्यावेळी मला काहीच वाटलं नाही, मी निर्ढावलेला माणूस आहे. अजित पवारांनी त्यांच्या गाडीचे नट काढण्याचे काम केलं, असं राऊत म्हणाले.

मी कोणालाही घाबरत नाही. मी मारामाऱ्याही करुन आलेलो आहे. हिंमत असेल तर कुणालाही घाबरायची गरज नाही, मग पंतप्रधान असो की अजून कुणी, मी त्या काळात दाऊद इब्राहिमलाही दम दिला होता, असं राऊत म्हणाले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी करिम लाला याची भेट घेण्यासाठी यायच्या, असा दावाही संजय राऊत यांनी केला मुलाखत चांगली व्हावी असं जर वाटत असेल तर समोरचा माणूस चिडला पाहिजे, असा सल्लाही राऊतांनी यावेळी दिला.
थोडे नवीन जरा जुने