निरोगी जीवन जगण्यासाठी "या" सवयी नक्की लावून घ्या !


निरोगी काया म्हणजे पहिले सुख मानले जाते. यासाठी फार काही नाही, तर केवळ या सवयी तुम्ही लावून घेतल्या तर निरोगी जीवन मिळते. 


रोज हजार पावले चाला. यामुळे वजन नियंत्रित राहते. हृदयरोग, उच्च रक्तदाब व टाईप - २ डायबिटीसचा धोका कमी होतो.

रोज ८ तासांची गाढ झोप घ्या. अशी झोप घेण्याने मेंदू शरीराला आजारा विरुद्ध विरुद्ध लढणाच्या हार्मोन्सची निर्मिती करण्याचा आदेश देतो. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते व स्मरणशक्तीही सुधारते.

रोज ७ ग्लास पाणी प्या. ही सवय मेंदूला तल्लख बनविते. त्वचेतील ओलावा कायम राहतो. शरीराची अंतर्गत स्वच्छता सुधारते व रोग प्रतिकारशक्तीही वाढते.

रोज ६ मिनिटे ध्यानधारणा करा, ध्यानाचे शारीरिक तसेच मानसिक लाभ होतात. ध्यान केल्याने तणाव, नैराश्य कमी होते व एकाग्रताही वाढते.

५ वेळा फळे व भाज्या यांचे सेवन करा. त्यातील भरपूर व्हिटॅमिन व खनिजे तुम्हाला निरोगी ठेवतील व दिवसभर फ्रेशही ठेवतील.
थोडे नवीन जरा जुने