कोमट पाण्यात पाय बुडवून ठेवल्यास आलेला थकवा होईल दूर !


मॉलमध्ये किंवा मार्केटमध्ये फिरायला तर सर्वांना आवडतं, पण तिथून आल्यावर जो थकवा येतो त्याने अगदी काही काम नको नकोसं वाटतं. पण असा थकवा आपण काही वेळातच दूर करू शकता. त्यासाठी हे करा : 

या प्रयोगाने किडनीची एनर्जी वाढते


एका टबमध्ये कोमट पाण्यात थोडंसं मीठ घालून आपले दोन्ही पाय बुडवा. याने थकवा दूर होतो आणि चालताना सूज आली असल्यास त्यावरही आराम मिळतो. 

ज्या लोकांना रात्री झोप न येण्याची तक्रार असते त्यांनी हा प्रयोग नक्की अमलात आणावा. झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात १५ ते २० मिनिटे पाय बुडून ठेवावे. 

रक्त प्रवाह सुरळीत होतो 

जे लोक रात्रभर एकाच कुशीवर निजतात त्याने सकाळी उठून हा प्रयोग करावा. याने दिवसभर फ्रेश जाणवेल.

संधिवाताची तक्रार असलेल्या लोकांनी पाण्यात दालचिनी आणि काळे मिरे टाकून पाय पाण्यात ठेवावे.
जेवण झाल्यावर करणे योग्य ठरेल 

लो ब्लड प्रेशरची तक्रार असलेल्यांनी गरम पाण्यात पाय ठेवून बसू नये. मधुमेही रुग्णांनीही हा प्रयोग करू नये.
थोडे नवीन जरा जुने