लिव्हर ठणठणीत ठेवण्यासाठी 'हा' आहार घ्या...लिव्हर म्हणजे शरीरातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. लिव्हर शरीरातील विविध क्रिया नियंत्रित करते. लिव्हर खराब झाल्यास शरीराची कार्य करण्याची क्षमता अत्यंत क्षीण होते. काही चुकीच्या सवयींमुळे लिव्हर लवकर खराब होते. 


उदा. अल्कोहल जास्त प्रमाणात घेणे, धुम्रपान जास्त करणे, आंबट जास्त खाणे, जंक फूड, जास्त मिठाचे सेवन इ. आज आम्ही तुम्हाला औषध न घेता केवळ आहाराने लिव्हर निरोगी ठेवण्याचे काही खास उपाय सांगत आहोत.

लिव्हरला सर्वात जास्त प्रभावित करतात शरीरातील विषारी घटक. यामुळे लिव्हरचा उपचार करण्यापूर्वी रुग्णाचे रक्त शुद्ध असणे आवश्यक आहे. यासाठी अतिरिक्त विश्रामाची आवश्यकता आहे.

1. सकाळी उठून मोकळ्या हवेत दीर्घ श्वास घ्या. सकाळीच काही अंतर पायी चालावे आणि चालताना मोकळ्या हवेत दीर्घ श्वास घ्यावा. यामुळे लाभ होईल.


2. आठवड्यातून कमीत कमी तीन दिवस मोहरीच्या तेलाने शरीराची मालिश करावी. मातीचा लेप आठवड्यातून एकदा संपूर्ण शरीरावर अवश्य लावावा. आठवड्यातून एकदा तरी स्टीम बाथ घ्यावा. सन बाथही घेऊ शकता.

लिव्हरशी संबंधित आजार दूर करण्यासाठी आहार चिकित्साही आवश्यक आहे. म्हणजेच काय खावे आणि किती प्रमाणात खाणे हे जाणून घेणे गरजेचे आहे. लिव्हरच्या आजारांपासुर दूर राहण्यासाठी तुम्ही या पदार्थांचे जास्त सेवन करावे.

1. लिव्हरच्या आजारात ज्यूसचे सेवन महत्त्पूर्ण मानले जाते. लिव्हरच्या रुग्णांनी नारळ पाणी, उसाचा शुद्ध रस किंवा मुळ्याचे ज्यूस आपल्या आहारात समाविष्ट करावे. पालक, चवळी, भोपळा, गजर, शलजम ज्यूसही घेऊ शकता.


2. दिवसातून 3 ते 4 वेळेस लिंबूपाणी घ्यावे. भाज्यांचे सूप प्यावे. पेरू, नाशपाती, मोसंबी, डाळिंब, पपई इ. फळांचे भरपूर सेवन करावे.


3. भाज्यांमध्ये पालक, करडी, मेथी, भोपळा, तोंडली इ. भाज्यांचे भरपूर सेवन करावे. सलाड, अंकुरित डाळीचे जास्तीत जास्त प्रमाणात सेवन करावे. गाजराचे सूपही लिव्हरचे आजार दूर करण्यास सहायक ठरते. वाफेवर शिजलेल्या किंवा उकळलेल्या पदार्थांचे सेवन करावे.


4. पालक आणि गाजर रसाचे मिश्रण लिव्हर सिरोसीसमध्ये रामबाण घरगुती उपाय आहे. गाजर आणि पालकाचा रस समान प्रमाणात मिसळून घ्यावा. लिव्हर ठीक करण्यासाठी हा नैसर्गिक रस दिवसातून कमीत कमी एक वेळेस तरी अवश्य घ्या.


5. फळांमध्ये जांभूळ लिव्हरचे आजार दूर करण्यात सहायक ठरते. दररोज 100 ग्रॅम जांभळाचे सेवन करावे. सफरचंद खाल्ल्यानेही लिव्हरला ताकद मिळते. लिव्हरवर सूज असल्यास खरबूजाचे सेवन जास्तीत जास्त प्रमाणात करावे.


6. आवळा व्हिटॅमिन 'सी' चा उत्तम स्रोत असून याचे सेवन केल्याने लिव्हर उत्तमप्रकारे कार्य करते. लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी दिवसातून 4-5 कच्चे आवळे अवश्य खावेत. एका रिसर्चनुसार आवळ्यामध्ये लिव्हरला सुरक्षित ठेवणारे सर्व तत्त्व उपलब्ध आहेत.


7. लिव्हरमधील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी सफरचंद व्हिनेगरचा उपयोग करावा. जेवण करण्यापूर्वी सफरचंदचे व्हिनेगर प्यायल्याने चरबी कमी होते. एक चमचा व्हिनेगर एक ग्लास पाण्यामध्ये मिसळून यामध्ये एक चमचा मध टाकून, हे मिश्रण दिवसातून दोन-तीन वेळेस घ्यावे.


8. प्राणायाम आणि योगाही खूप उपयोगी

अनुलोम विलोम प्राणायाम, भस्रिका प्राणायाम सकाळी अवश्य करावा. या सर्व नियमांचे पालन केल्यास तुम्ही लिव्हरच्या आजारांपासून दूर राहू शकता.
थोडे नवीन जरा जुने