वजन कमी कसे करायचे आणि लवकर वजन कमी करण्यासाठी या आहेत पॉवरफुल टिप्स...


मुंबई: वजन कमी कसे करायचे आणि लवकर वजन कमी करण्यासाठी या आहेत पॉवरफुल टिप्स... प्रत्येकजण वजन कमी करण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करत असतो. मात्र, अनेकदा बरेच प्रयत्न करूनही यश मिळत नाही. त्यामुळे अनेकजण वजन कमी करण्याचे प्रयत्न अर्ध्यावरच सोडून देतात. जाणून घ्या अशा काही पॉवरफुल टिप्स ज्यांच्या मदतीने तुम्ही वेट लॉस करू शकता.

आपल्या डाएटमध्ये प्रोटीनचा समावेश करा

संतुलित आहारात प्रोटीन असणे गरजेचे असते. प्रोटीन हा असा एक पदार्थ आहे ज्याच्या मदतीने तुम्ही वजन कमी करू शकता. खरंतर, प्रोटीन वजन घटवण्यास खूप फायदेशीर ठरते. प्रोटीनच्या मदतीने तुम्ही वजन वाढवण्यासोबत वजन कमीही करू शकता. प्रोटीनचे सेवन जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला लवकर भूक लागत नाही. प्रोटीनच्या सेवनाने शरीरातील जमा अनावश्यक फॅट बाहेर निघतात. यासाठी तुम्हाला जर वेट लॉस करायचे आहे तर योग्य प्रमाणात प्रोटीनचे सेवन करणे गरजेचे आहे.

पाचनक्रियेचा वेग वाढवा

जर तुमच्या शरीरात मेटाबॉलिजमचा रेट योग्य आहे तर तुमचे वजन वाढणार नाही. ग्रीन टी पिणे, रात्री पुरेशी झोप घेणे, भरपूर पाणी पिणे यामुळे शरीरात फॅट वाढणार नाही. तसेच शरीराचा आकार योग्य राहण्यास मदत होईल. खाण्यामध्ये फायबर फूडचे प्रमाण वाढवल्यास तुमचा मेटाबॉलिजमचा रेट योग्य होईल. यामुळे वेगाने वजन कमी होण्यास मदत होईल. प्रोटीनची मात्रा अधिक घेतल्याने शरीरात मेटाबॉलिजचा रेट वाढतो. यामुळे भूक कमी लागते. यामुळे वजन नियंत्रित करणारे हार्मोन्समध्ये बदल होतो. जाणकारांच्या मते प्रोटीनच्या योग्य सेवनाने मेटाबॉलिक रेट २० ते ३० टक्क्यांनी वाढतो. 

खाण्यामध्ये शुगर, स्टार्च आणि कार्बोहायड्रेटचे सेवन कमी करा

लठ्ठपणा कमी करण्यासाठी तसेच फॅट लूज करण्यासाठी तुम्हाला आहारात गोड पदार्थ, स्टार्च आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी करावे लागेल. यांचे आहारात सेवन कमी केल्यास तर भूक कमी लागेल. याप्रकारच्या बदलामुळे तसेच खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल केल्यास तुम्हाला शरीरात नक्कीच बदल दिसू लागेल.
थोडे नवीन जरा जुने