सकाळी केलेला 'हा' छोटासा व्यायाम तुम्हाला आजारापासून मुक्‍ती देऊ शकतो.


सुखाने आणि आनंदाने जगायचे असेल तर आरोग्‍याशी निगडीत काही गोष्‍टींकडे आपल्‍याला विशेष लक्ष द्यावे लागते. त्‍यासाठी स्‍वत:ला तंदुरूस्‍त ठेवणे आवश्‍यक असते. मन आणि शरीरासाठी प्रत्‍येकाने काही वेळ काढला पाहिजे. 

तरूणपणी योग्‍य काळजी घेतली नाही तर संपूर्ण आयुष्‍य डॉक्‍टर आणि औषधांच्‍या आधारेच जगावे लागते. इथे आम्‍ही तुम्‍हाला अशी एक माहिती देणार आहोत जी तुमच्‍याजवळ असूनही त्‍याचा तुम्‍हाला संपूर्ण लाभ घेता आलेला नाही. सर्व रोगांवर एकच औषध आहे ते म्‍हणजे 'हसणे'. सकाळच्‍या प्रहरी फक्‍त 20 मिनिटापर्यंत हसून ताजेतवाने होता येते.

हसण्‍यामुळे आपले आरोग्‍य तर सुधारतेच त्‍याचबरोबर आत्‍मविश्‍वासही वाढतो, तसेच अनेक गंभीर आजारही दूर होतात. आपली रोगप्रतिकार क्षमता वाढते, मन प्रसन्‍न राहते आणि कामातही लक्ष लागते.
थोडे नवीन जरा जुने