केशर आरोग्यासाठी चांगले असतेच पण हे इतरही फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित !


केशर आरोग्यासाठी चांगले असतेच पण सौंदर्यासाठीही त्याचा फायदा होतो. त्वचा उजळण्यासाठी, केशर नेहमी वापरले जाते.  बाळाची त्वचा चांगली व्हावी म्हणून गर्भवती महिलांना  दुधात केशर घालून दिले जाते. केशराच्या सौंदर्यवर्धक फायदे तर तुम्हाला माहीतच आहे, परंतु, त्याचे काही आरोग्यदायी फायदे देखील आहेत.

कँसरचा धोक्यापासून वाचाल! 

शरीरात ट्युमरची निर्मिती किंवा ट्युमर वाढ कमी होण्यास केशर उपयुक्त आहे. स्किन कैंसरचा धोका टाळण्यासाठी केशर परिणामकारक कार्य करतं. किमोथेरपीमुळे होणारे साईड इफेक्ट्स म्हणजेच वजन कमी होणे, हिमोग्लोबिन कमी होणे यावर मात करण्यासाठी केशराचा फायदा होतो. केशराचे नियमित सेवन केल्यास शरीरातील व्हिटॅमिन 'ए'चे प्रमाण वाढते.

दृष्टीत सुधारणा होईल - 

शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यास डोळ्यांचा रेटिना खराब होऊ शकतो. केशरात कोलेस्टेरॉल कमी करण्याचे गुणधर्म आहेत. त्यामुळे या समस्येला प्रतिबंध होईल,

स्मृती वाढवण्यासाठी : 

स्मृर्ती वाढवण्यासाठी केशराचा उपयोग होतो. अल्झायमरसारख्या आजारांना प्रतिबंध करण्याचा केशर हा नैसर्गिक उपाय आहे. 

वयोमानानुसार येणारा विसराळूपणा कमी करण्यासाठी केशराची मदत होते.
थोडे नवीन जरा जुने