अक्षयकुमारच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल


पुणे :- मावळ्यांचा पेहराव करून, अयोग्य पद्धतीने आयुष लिमिटेडच्या निरमा पावडरची जाहिरात केल्याप्रकरणी अभिनेता अक्षयकुमार याच्याविरोधात संभाजी ब्रिगेडने पुण्यात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

पराक्रमी मावळ्यांचा आणि महाराष्ट्राच्या वीरवृत्तीचा या जाहिरातीद्वारे अपमान करण्यात आला आहे. मराठ्यांची अस्मिता दुखावली असल्याने ही जाहिरात त्वरित बंद करावी आणि राष्ट्रपुरुषांची बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. 

सध्या अक्षयकुमारने केलेली निरमा वॉशिंग पावडरची जाहिरात समाजमाध्यमांवरही व्हायरल झाली असून, ट्रोल होत आहे. मर्दमराठी पराक्रमी मावळ्यांचा वेश परिधान करून अक्षयकुमार शिंदेशाही पगडी घालून या जाहिरातीत वीरपुरुषांचा अपमान करत आहे. त्यामुळे ही आक्षेपार्ह जाहिरात तत्काळ बंद करावी, या मागणीसाठी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
थोडे नवीन जरा जुने