शाकाहारी व्यक्तींनी 'अशा' प्रकारे मिळवा शरीराला आवश्यक प्रोटीन.


जर आपण शाकाहारी असाल आणि आपणास अशक्तपणा जाणवत असेल तर हे आपल्या शरीरात प्रोटिन्सची (प्रथिने) कमी असल्याचे संकेत आहे. यासाठी आहारात अमूलाग्र बदल घडविणे अत्यावश्यक आहे.

प्रोटिन्सचे महत्त्व : 

प्रोटिन शरीरातील मांसपेशी, हाडे विविध अवयवांचे भरण-पोषण करते. तसेच शरीरात हिमोग्लोबीन तयार करण्यास मदत करते. हिमोग्लोबीन ऑक्सीजनचा वाहक ठरतो. प्रोटिन्स मिळाले नाही तर अवयवांची कार्यक्षमता कमी पडत जाते. शरीरातील इतर गोष्टींच्या हालचालींच्या कामासाठीही प्रोटिनची आवश्यकता असते. प्रोटिन्सच्या कमीमुळे फुफ्फुसाच्या कार्यप्रणालीवर विपरित परिणात होतो. लिव्हर संदर्भातील समस्या, हिपेटायटीस, क्रॅश डायटर्स आणि शाकाहारी लोकांच्या शरीरात प्रोटिन्स कमी असल्याचा त्यांना झटपट आजार उद्भवतात.


या आहाराने मिळेल प्रोटिन्स : 

शरीरातील प्रोटिनची मात्रा वाढविण्यासाठी अमिनो अँसीडचे प्रमाण अधिक असलेल्या पदार्थांचे सेवन करा त्यामुळे प्रोटिनची निर्मिती होते. अंडी, मांस, दुग्धजन्य पदार्थ, मासे यात जास्त प्रमाणात प्रोटिन असते. शाकाहारी नागरिकांनी केवळ दुग्धजन्य पदार्थ सेवन करावेत, यात पनीर, दही, डाळ, सोयाबीन आणि दररोज एक ग्लास दूध शरीरात आवश्यक प्रोटिन तयार करतात. शाकाहारींना डाळ हीच जास्त प्रोटिन देते, असा समज आहे. मात्र, असे नसून यामुळे शरीरास जास्त प्रमाणात प्रोटिन मिळत नाही. म्हणूनच दुग्धजन्य पदार्थांच्या सेवन करावे.


प्रत्येकास प्रोटिनची गरज : 

सिरम प्रोटिन टेस्ट केल्याने शरीरात असलेल्या एल्बुमिन आणि ग्लोबुलिन या दोन प्रमुख प्रोटिनचे प्रमाण तपासता येते. एल्बुमिन रक्त वाहिन्यांमधील रक्ताचे लिकेज कमी करते, तसेच औषधांचा प्रभाव रक्तापर्यंत पोहोचविण्याचे काम करते. तर ग्लोबुलिन हिमोग्लोबिनसोबत मिळून संक्रमणाच्या विरोधात काम करते. प्रत्येकास प्रोटिनची गरज असते.
थोडे नवीन जरा जुने