ज्या व्यक्ती जवळ 'या' गोष्टी असतात, ती व्यक्ती कधीही दुःखी होत नाही !


प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात सुख आणि दुःख ये-जा करती असतात. यामुळेच म्हटले जाते की, कोणताही व्यक्ती पूर्णपणे सुखी राहत नाही. कोणती न कोणती कमतरता प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात अवश्य असते, परंतु महाभारतातील एक प्रसंगामध्ये महात्मा विदुर यांनी काही अशा गोष्टी सांगितल्या आहेत. जर या गोष्टी एखाद्या व्यक्तीकडे असतील तर तो कधीही दुःखी राहत नाही म्हणजेच भाग्यवान असतो. महाभारताच्या उद्योग पर्वामध्ये महात्मा विदुर यांनी या युगात सहा प्रकारचे सुख सांगितले आहेत. जे पुढील प्रमाणे आहेत...

धन
सुखी जीवनासाठी पैसा असणे खूप आवश्यक आहे. पैसा नसेल तर मान मिळत नाही आणि यशही. कुटुंबाचे पालन-पोषण करण्यासाठी धन आवश्यक आहे. सध्याच्या काळात शिक्षण घेण्यासाठीसुद्धा भरपूर पैसा लागतो. पैसे नसेल तर एखाद्या आजारी व्यक्तीवर उपचार करणेसुद्धा शक्य नाही. वृद्धावस्थेमध्ये पैसाच सर्वात मोठा आधार असतो. जीवनात धनाची आवश्यकता सर्वात जास्त म्हातारपणातच असते.

निरोगी (स्वस्थ) शरीर -
जीवनात सदैव सुखी राहण्यासाठी शरीर तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. शरीराला एखादी व्याधी असेल तर तुम्ही व्यवस्थित काही खाऊ-पिऊ शकत नाहीत. अशा अवस्थेमध्ये तुम्ही जीवनातील अनेक सुखांपासून वंचित राहू शकता. जर तुम्हाला सामान्य आजार असेल तर त्याचेही त्रास सहन करावा लागतो. आजार मोठा असेल तर दवाखाना, औषधी इ. गोष्टींमध्ये पैसा आणि वेळ खर्च होतो. निरोगी शरीर असणारा व्यक्ती कोणतेही काम करण्यास सक्षम असतो. गरज पडल्यास तो शारीरिक श्रम करू शकतो, याउलट रोगी व्यक्ती हे करू शकत नाही. यामुळे शरीर निरोगी असणे आवश्यक आहे.

सुंदर पत्नीजी प्रिय बोलणारी असेल
महाभारतामध्ये महात्मा विदुर यांनी पत्नीला तिसरे आणि जर ती गोड बोलणारी असेल तर चौथे सुख सांगितले आहे. पत्नी सुंदर असेल तर तुमचे मन बाहेर भटकणार नाही आणि या स्थितीमध्ये करण्यात आलेल्या पापांपासून तुम्ही दूर राहू शकतो. सुंदर पत्नी जर गोड बोलणारी असेल तर दुग्धशर्करा योग समजावा. गोड म्हणजे सर्वांशी नम्रतापूर्वक संवाद साधून ती कुटुंबातील सर्व सदस्यांना प्रभावित करू शकते. कुटुंब आनंदी असेल तर तुम्ही स्वतः प्रसन्न राहू शकता. पत्नी कटू बोलणारी असेल तर पती-पत्नीमध्ये दररोज कोणत्या न कोणत्या कारणावरून वाद होऊ शकतात. यामुळे पत्नी सुंदर आणि गोड बोलणारी असेल तर व्यक्तीला दुःखी राहवे लागत नाही.

मुलगा आज्ञाधारक असणे -
वर्तमान काळात सर्वात मोठी समस्या मुलांबद्दल आहे. आपत्य जर चुकीच्या मार्गावर गेले तर यासाठी आई-वडिलांना दोष दिला जातो आणि जर आपत्य विद्वान होऊनसुद्धा आई-वडिलांच्या वशमध्ये नसेल तर सर्वात जास्त दुःख यांनाच होते. अनेक ठिकाणी असे दिसून येते की, आई-वडील मुलाला उच्चशिक्षणासाठी परदेशात पाठवतात आणि तो मुलगा तिकडेच वास्तव्य करतो. म्हातारपणात जेव्हा आई-वडिलांना आपल्या मुलांची सर्वात जास्त गरज असते तेव्हा ते जवळ नसतात. मुलगा जवळ असेल आणि तो आज्ञाधारक नसेल तर ते आणखीनच दुखदायी असते. यामुळे विदुर सांगतात की, ज्या व्यक्तीचा मुलगा आज्ञाधारक असतो त्याला जीवनात दुःखी रहावे लागत नाही.

पैसा प्राप्त करून देणाऱ्या विद्येचे ज्ञान -
पैसा हा येतो आणि जातो. पैशाचा हा गुणधर्मच आहे. अनेकवेळा असे दिसून येते की, एखादा व्यक्ती धनवान असतो आणि काही काळानंतर तो एक-एक पैशासाठी वणवण फिरतो. असे अशा लोकांसोबत घडते ज्यांच्याजवळ वडिलोपार्जित धन असते आणि हे धन ते अनियमितपणे खर्च करतात. अशा परिस्थितीपासून दूर राहण्यासाठी तुमच्याजवळ एखाधी अशी कला किंवा ज्ञान असणे आवश्यक आहे, ज्यामुळे धनाची आवक कायम राहील. तुमच्याजवळ ज्ञान असेल तर धनाची कमतरता भासत नाही.
थोडे नवीन जरा जुने