'हे' आहेत फायदे सर्वांगासनाचे, वाचून तुम्हाही आश्चर्यचकित व्हाल!


आजचे युग स्पर्धेचे आहे. त्यामुळे सर्वांना अधिक काम करावे लागते. शारीरिक आणि मानसिक श्रम अधिक झाल्यामुळे अनेकांची चिडचिड होते. छोट्या छोट्या गोष्टींवरून मानसिक शांती ढळते. परंतु जे लोक दररोज योगसाधना करतात, त्यांना मनशांती लाभते.

 सर्वांगासनामुळे शरीरातील काही सूक्ष्म ग्रंथी आणि मर्मस्थाने सक्रीय 
होतात. यामुळे क्रोध वाढविणारा आवेश हळू हळू कमी होत जातो.

सर्वांगासन कसे करावे?
सपाट जमीनीवर शवासनात काही क्षण झोपून राहा. आता हळू हळू दोन्ही पाय उचलून काटकोनात आणा. आता चित्रात दाखविल्याप्रमाणे दोन्ही हातांचा आधार घेत खांद्यापासूनचा भाग वरच्या दिशेत स्थिर ठेवा. आपल्या क्षमतेप्रमाणे या आसनात काही सेकंद स्थर थांबा. श्वास उच्छवास याकडे लक्ष ठेवा. हळू हळू सराव वाढवा. पाठीच्या मणक्याचा त्रास, डोळ्यांचे विकार आणि उच्च रक्तदाब असणार-यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय हे आसन करू नये.


लाभ
या आसनाच्या नियमीत सरावाने मानसिक ताण तणाव, निराशा, हताशा, चिंता आदी व्याधी दूर होतात. डोळे तेजस्वी होतात. चेहरा तेजस्वी बनतो. स्त्रीयांना विशेष लाभदायक. मासीक पाळीसंबंधीच्या तक्रारी दूर होतात. रक्ताभिसरण उत्तम होऊ लागते.
थोडे नवीन जरा जुने